महाड : प्रतिनिधी परीक्षा संपताच महाडमधील मुलांची पावले बगीच्याकडे वळली मात्र बगिच्यांची झालेली दुरवस्था पाहून बच्चेकंपनी चांगलीच नाराज झाली आहे. महाडमध्ये असलेल्या बागांची दुरावस्था झाली आहे. शहरात छत्रपती शिवाजी चौकातील एकमेव बाग सध्या सुरु असते मात्र या बागेतील खेळणी मोडली आहेत. शहरातील इतर बगीचे तर ओस पडले आहेत. विविध ठेक्याच्या …
Read More »जंगलात पक्षांसाठी पाणवठे, रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनचा उपक्रम
रोहे : प्रतिनिधी उन्हाळ्यात जंगलातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनच्या वतिने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात्रेत टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या एकत्र करुन फांउडेशनच्या कार्यकर्त्यानी त्या जंगलात टांगून ठेवल्या आहेत. त्यात पाणी साठवण करण्यात येत असल्याने जंगलातील पक्षांची तहान भागत आहे. या उपक्रमाबद्दल स्वामीराज फांउडेशनचे सर्वत्र कौतुक …
Read More »म्हसळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, कुंभारवाड्यातील मुलांना घेतला चावा
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, शुक्रवारी (दि. 3) कुंभारवाडा परिसरांतील योगेश देऊळकर यांच्या घरी आलेल्या अर्जुन, आरोही यांच्यासह छोट्या 2-3 मुलांना कुत्रा चावल्याची घटना घडली. त्यांच्यावर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबरोबरच म्हसळा शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढले …
Read More »जादूगार अवधूतने नेरळकरांना हसवले…. जयदीप मंडळाच्या कार्यक्रमात जादूचे प्रयोग
कर्जत : बातमीदार नेरळ येथील जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बुधवारी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा केला. रात्री जादूगार अवधूत यांनी जादूचे प्रयोग सादर केले. त्यावेळी शेकडो बालगोपाळ आणि महिलांनी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. नेरळ पूर्वेचा राजा समजल्या जाणार्या जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, उपोषण स्थगित
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे दिल्याने कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थी आणि पालकांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (दि, 2) रात्री दहा वाजता स्थगित करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत न कळविणार्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, …
Read More »नागोठण्याचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद
नागोठणे : प्रतिनिधी तांत्रिक दुरुस्तीनिमित्त नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा शुक्रवारी (दि. 3) दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले …
Read More »आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 13 लाख 24 हजाराचा अपहार
तत्कालीन अधिकारी, ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी आदिवासींसाठी असलेल्या योजनांमधील 13 लाख 24 हजार 527 रुपयांच्या निधीचा अपहार पेण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीसाठी गठीत केलेल्या पाच सदस्यीय गायकवाड समितीने केलेल्या चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात …
Read More »चौक-कर्जत मार्गावर फोर्ड इंडिव्हर गाडी पेटली
खालापूर, कर्जत : प्रतिनिधी मुंबई येथील रमेश लाड यांचा कर्जत येथे फार्महाऊस असून बुधवारी सकाळी ते कर्जत येथून मुंबईकडे जाण्यास निघाले होते. आपल्या फोर्ड इंडिव्हर गाडीने ते आपली पत्नी आणि मुलगी सोबत जात होते. मात्र कर्जत-चौक रस्त्यावरील मोर्बे गावाजवळ त्यांच्या त्या महागड्या गाडीने अचानक पेट घेतला आणि गाडी जळून खाक …
Read More »साथी हाथ बढाना
उमटे धरणातील गाळ उपसण्याची मोहीम सुरू अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील सुमारे 70 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणारे उमटे धरण गाळणे भरले आहे. धरण परिसरातील 18 गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या धरणातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेतली आहे. 1980 साली उमटे धारण बांधण्यात आले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट असून …
Read More »माणगावात वनखात्याच्या धाडीत 111 पोती कोळसा जप्त
माणगाव : प्रतिनिधी वणवे, वृक्षतोड आणि कोळशांच्या भट्ट्या यामुळे कोकणची वनसंपत्ती नष्ट करणार्या गुन्हेगारांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने वनखात्याच्या फिरत्या पथकाने आता जोरदार पावले उचलली आहेत. रोहा येथील वनखात्याच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज सकाळी रातवड गावातील विलास सुर्वे यांच्या मालकीच्या जागेत धाड टाकून कोळशाच्या 111 पोती जप्त करण्यात आल्या …
Read More »