माणगाव : प्रतिनिधी वणवे, वृक्षतोड आणि कोळशांच्या भट्ट्या यामुळे कोकणची वनसंपत्ती नष्ट करणार्या गुन्हेगारांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने वनखात्याच्या फिरत्या पथकाने आता जोरदार पावले उचलली आहेत. रोहा येथील वनखात्याच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज सकाळी रातवड गावातील विलास सुर्वे यांच्या मालकीच्या जागेत धाड टाकून कोळशाच्या 111 पोती जप्त करण्यात आल्या …
Read More »‘कुंडलिका‘ बनत आहे पर्यटकांचे आकर्षण
बच्चे कंपनी घेताहेत पाण्यात डुबण्याचा आनंद रोहे ः प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात सगळ्यात कमी प्रदुषीत म्हणून कुंडलिका नदीची ओळख आहे. निर्मळ वाहणार्या या नदीच्या पात्रात सायंकाळी मोठया प्रमाणात नागरिक व लहान मुले पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. तर सायंकाळी या परिसरात फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. रोह्याची जीवन वाहनी …
Read More »वाढते तापमान पाळीव जनावरांच्या जीवावर
काळजी घेण्याचे पशुवैद्यकीय विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, त्याचा फटका मानवी जीवांबरोबर पाळीव जनावरांनादेखील बसू लागला आहे. पाळीव जनावरांना उष्माघात आणि कोल्डस्ट्रोकची बाधा होत आहे. शेतकर्यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. ग्लोबलवॉर्मिंगची …
Read More »कोर्लई किल्ल्यावरील तोफांसाठी लाकडी गाडे
रेवदंडा : प्रतिनिधी : मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यावरील भग्नावस्थेत पडलेल्या 6 तोफा आता लाकडी गाड्यांवर सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सह्याद्री प्रतिष्ठाणच्या वतीने किल्ले कोर्लई येथे बुधवारी (दि. 1) तोफगाडा दुर्गार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी किल्ले कोर्लई पायथ्यापासून गडापर्यंत शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर सहयाद्री प्रतिष्ठाण-पेण या संस्थेतर्फे देण्यात …
Read More »पालक संघर्ष समितीचे आजपासून साखळी उपोषण सुरू
इंग्लिश मिडीयम स्कुल गुण प्रकरण कर्जत : प्रतिनिधी : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरीक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला वेळेवर कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी विविध प्रकारे आंदोलन केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर …
Read More »वेताळवाडी किल्ल्यावरील तोफगाडा सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत लोकार्पण
कर्जत : प्रतिनिधी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणार्या संघटनेमार्फत दि. 28 एप्रिल रोजी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसून यात तोफेस या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान करून त्याचे चाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण व भारत विकास परिषदेचे क्षेत्रिय …
Read More »आठ महिन्याच्या ब्रेकनंतर कर्जत नगर परिषदेची टोईंग व्हॅन सुरू
कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील वाहतूक समस्या वाढत होती. ती सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सुरू केलेली टोईंग व्हॅन तांत्रिक बाबीमुळे बंद पडली होती. अखेर आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा बुधवार (दि. 1)पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही, कशीही गाडी पार्क करणार्यांनो सावध व्हा, आपल्यावर कारवाई होऊ शकते. …
Read More »किल्ले रायगड परिसरांत जळालेली कार, घातपताचा संशय
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये दाट जंगल आणि निर्जन परिसरांत बुधवारी (दि. 1) सकाळी स्थानिक ग्रामस्थांना जळत असलेली कार आढळून आल्याने सदरची घटना घातपाताची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाड तालुका पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन जळत असलेल्या कारची पहाणी केली. मात्र या जळलेल्या कारचे गुढ वाढले आहे. किल्ले …
Read More »कर्जत एसटी आगारातील कर्मचार्यांचे उपोषण
कर्जत : बातमीदार एसटीच्या कर्जत आगारातील आठ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही. त्यामुळे या कामगारांनी बुधवार (दि. 1) पासून बेमुदत उपोषण सुरू केले. एसटी आगराबाहेर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांची ठाणे येथील कामगार अधिकार्यांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र सर्व …
Read More »अलिबाग-रोहा रस्ता होणार सुसाट; चौपदरीकरणास शासनाची मंजुरी
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग – रोहा रस्ता आता सुसाट होणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकणास मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर पोयनाड – नोगोठणे रस्त्याच्या कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे. या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या असून लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे अलिबाग – मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष …
Read More »