Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी

कर्जत : बातमीदार नेरळ साई मंदिर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास  डॉ. कुणाल राठोड यांचा दवाखाना आणि मेडिकल स्टोअर्स  तसेच युवराज बिल्डिंगमधील संतोष धुळे यांचे किराणा दुकान फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसले तरी त्यांनी तेथील वस्तूंचे नुकसान केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळ साई …

Read More »

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

पाणीटंचाई  कर्मचार्‍यांची वानवा  दूरध्वनी सेवा बंद महाड : महेश शिंदे किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेचे जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य सेविका, पाणी, दूरध्वनी संपर्क अशा अनेक समस्यांना येथील कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडच्या …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू ; विंधण विहीरी खोदण्यास वेग

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, काही ठिकाणी विंधण विहीर खोेदण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकून 49 गावे व 108 वाडया त्यापैकी  साक्षीभैरी, कोढें पंचायतन, शेखाडी, साखरी, गुळधे, बापवली, नागलोली, आदगाव व धनगरमलई या …

Read More »

तीन दिवसानंतर बलाप ग्रामस्थ गावात परतले

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ तीन दिवसांसाठी गावाबाहेर राहण्यासाठी गेले होते. ते रविवारी (दि.5)पुन्हा आपापल्या बलाप गावातल्या घरी परतले. दर नऊ वर्षांनी येणार्‍या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला बलाप गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव सोडतात. आणि गावाबाहेर वेशीवर शेतात खोपटे किंवा झोपड्या करून साधारण तीन …

Read More »

मुरुडमध्ये किडनी रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणार -पद्मश्री डॉ. लहाने ; डायलेसिस सेेन्टरचे लोकार्पण

मुरुड : प्रतिनिधी    किडन्या पुर्णपणे बंद झाल्या तरी रुग्ण डायलिसिसद्वारे आपली जीवनचर्या चालू ठेवू शकतो. मुरुड परिसरातील किडनी रुग्णांना जीवदान देण्याचा आमचा संकल्प असून संजीवनी आरोग्य सेवा संस्थेमार्फत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जाईल, अशी ग्वाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. …

Read More »

टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवा ; उपविभागीय आधिकार्यांचे लघु पाटबंधारे विभागाला निर्देश

म्हसळा : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाने पाभरे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने काही गावांत टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. कामादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करून लघु पाटबंधारे विभागाने संबंधीत गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, असे निर्देश उपविभागीय आधिकारी प्रविण पवार यांनी दिले दिले आहेत. ऐन उन्हाळ्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत …

Read More »

खालापुरातील गावे तहानलेलीच : 11 गावे, 27 वाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरूच

खालापूर : अरुण नलावडे खालापुर तालुक्यातील 11 गावे आणि 27 आदिवासीवाडयातील नागरिकांचा घसा तहानेने  कोरडा पडला आहे. तालुक्यात बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी तसेच चार मोठी धरणे, चार बंधारे व पाझर तलाव आहेत. त्यात मुबलक पाणी असताना तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खालापूरातून पातळगंगा ही बारमाही …

Read More »

कर्जत ताडवाडी येथे महिलेचा नवर्‍याने केला खून

कर्जत ़: बातमीदार दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला ठार मारण्याची घटना कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रविवारी (दि. 5) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पतीने जंगलात पळ काढला असून, नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंब जवळील फोंडेवाडी येथील योगेश …

Read More »

माथेरानच्या दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू

कर्जत : बातमीदार येथे पर्यटनासाठी आलेल्या दिवा (जि. ठाणे) येथील पर्यटक महिलेचा दरीत पडून मृत्यू झाला. गीता मिश्रा असे या महिला पर्यटकाचे नाव होते. दिवा येथील अभिषेक मिश्रा हे आपली पत्नी गिता, दोन मुली चाहत, अन्यना तसेच मित्र सचिन शुक्ला यांच्यासह शनिवारी (दि.4) माथेरानला पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या …

Read More »

बांगरवाडीतील विहिरीत अज्ञात व्यक्तीने टाकले विषारी औषध

कर्जत : प्रतिनिधी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील बांगरवाडीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असताना येथील विहिरीत शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात बांगरवाडी येथील विहिरीत विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहेत, तसेच औषध टाकणार्‍याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली …

Read More »