Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत : पोटल, पाली ग्रामपंचायतीत आघाडीची सत्ता; एका जागेवर ‘कमळ’ उमलले

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी …

Read More »

पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिंकली

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील प्रतिष्ठेची पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)ने जिंकली असून या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत शेकापने तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिंकली आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द आणि देगाव या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन मतमोजणी सोमवारी …

Read More »

पोलादपूर तालुक्यात चारपैकी तीन सरपंचपदे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने तीन सरपंचपदे जिंकली असून एका ठिकाणी श्रीराम विकास आघाडीचा सरपंच झाला आहे. तुर्भे खोंडामध्ये सरपंच व सात सदस्य शिंदे गटाचे – तुर्भे खोंडा येथील थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत  शिंदे गटाच्या कविता …

Read More »

वेश्वी, नवेदर-नवगावमध्ये विकास आघाडीचे सरपंच; अलिबागेतील दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या ग्रामपंचायतिंच्या  सरपंचपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीने  शेकापला जोरदार धक्का दिला. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे थेट सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्र गावडे तर नवेदर-नवगाव ग्रामपंचयात सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती आदर्शन घातकी विजयी झाल्या. शेकापचे …

Read More »

माथेरानमध्ये युवा रुखी गुजराती समाजाचा शिंदे गटात प्रवेश

माथेरान : रामप्रहर वृत्तसेवा येथील युवा रुखी गुजराती समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.16) बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माथेरान शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून कोणत्याही प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासन दिले. माथेरानमधील वाल्मिकी नगर भागातील युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष …

Read More »

महाडमधील मनसैनिक भाजपमध्ये

महाड : प्रतिनिधी आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाड नवेनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला.  महाड नवेनगर येथील कट्टर मनसैनिक अमोल सुंभे आणि विजय जाधव यांनी आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसादिनी भाजपत जाहीर प्रेवेश केला. भाजपचे  महाड तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे,  सरचिटणीस महेश शिंदे  आणि शहर …

Read More »

महाडच्या काळीज-खरवली ग्रामपंचायतीत सरपंच आघाडीचा, तर बहुमत शिंदे गटाचे

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील महत्त्वाच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदी  काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, तर सदस्य पदाच्या 13 पैकी 10 जाग जिंकून बाळासाहेबांची शिवसेनेने बहुमत मिळविले. महाड तालुक्यातील श्रीमंत आणि शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या काळीज खरवली या ग्रामपंचायत निवडनुकीचा निकाल सोमवारी (दि. 17) जाहीर करण्यात …

Read More »

समग्र रायगड कॉफी टेबल बूकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन सोमवारी (दि. 17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; आज मतमोजणी

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) तुरळक घटना वगळता मतदान प्रकिया शांततेत पार पडली. थेट सरपंचपदाच्या 16, तर सदस्यांच्या 184 जागांसाठी मतदान झाले. सोमवारी (दि. 17) मतमोजणी होणार आहे. मतदानास सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळी मतदारांचा उत्साह फारसा नव्हता. 11नंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसू …

Read More »

रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान

रायगडात सरपंचपदांसाठी 37, सदस्यपदांसाठी 298 उमेदवार रिंगणात अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) मतदान होत आहे. थेट सरपंचपदाच्या 17 जागांसाठी 37, तर 184 सदस्यांच्या जागांसाठी 298 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानदेखील सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होऊ घातली होती, पण …

Read More »