Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा

शिवसेना शिंदे गटाची खोपोली पालिका मुख्याधिकार्‍यांकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची तातडीने  दुरुस्ती करावी, अशी मागणी खोपोलीतील बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने वेगवेगळ्या विविध विकास कामाच्या पूर्ततेसाठी खोपोली नगरपालिकेला वीस कोटीचा …

Read More »

अलिबागच्या आरसीएफ प्रकल्पात स्फोट; तीन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्स् लिमिटेड (आरसीएफ) कंपनीच्या अलिबागजवळील थळ-वायशेत येथील प्रकल्पात स्टीम जनरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी 5च्या सुमारास घडली. …

Read More »

खाद्याचे प्रमाण कमी झाल्याने फणसाड अभयारण्यातील गिधाड संवर्धन मोहिमेस खीळ

मुरूड : प्रतिनिधी मृत जनावरे हे गिधाडांचे मुख्य खाद्य आहे. मात्र या खाद्याची वाणवा भासत असल्याने मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यामधील गिधाड संवर्धन मोहिमेची गती मंदावली आहे. गिधाडांचे संवर्धन व त्यांची संख्या वाढण्यासाठी फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क ट्रस्ट व अभयारण्याच्या माध्यमातून गिधाडांच्या आहार केंद्राची संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील …

Read More »

शेतकर्‍यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा -गजेंद्र घाडगे

पोलादपूर : प्रतिनिधी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या माध्यमातून शेतकर्‍यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. जे शेतकरी पी.एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, परंतु अद्याप कोणत्याही बॅकेचे पीक कर्ज नसेल, अशा शेतकर्‍यांनी केसीसी कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या  पोलादपूर शाखेचे व्यवस्थापक गजेंद्र घाडगे यांनी …

Read More »

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात केली जातेय रुग्णांची लूट

युवासेनेचे विपूल उभारेंचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून येथील डॉक्टर पैशाची मागणी करत असून, त्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी तसेच त्यांनी रुग्णांकडून घेतलेले पैसे वसूल करून संबंधीत रुग्णांना परत करावेत, अशी मागणी युवासेनेचे …

Read More »

परतीच्या पावसाने भातपिकांचे नुकसान

हातचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात  परतीच्या पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले आहे. उभी भाताची पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. हाती आलेले भात पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परतीच्या पावसाने …

Read More »

महाडच्या खरवलीत मिरवणूक अंगलट

नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी.   ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकार्‍याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर  महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा …

Read More »

मोदी सरकारची शेतकर्‍यांना दिवाळी भेट!

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी …

Read More »

पेण तालुक्यात 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी शिधाचा लाभ

पेण : प्रतिनिधी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांत रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील सुमारे 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर …

Read More »

कर्जत : पोटल, पाली ग्रामपंचायतीत आघाडीची सत्ता; एका जागेवर ‘कमळ’ उमलले

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी …

Read More »