दुखापतीमुळे के. एल. राहुल संघाबाहेर सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के. एल. राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. सराव करीत असताना त्याला दुखापत झाली होती.भारतीय …
Read More »नियमांचे पालन करा; अन्यथा येऊ नका!
क्विन्सलॅण्डच्या सरकारने टीम इंडियाला सुनावले सिडनी : वृत्तसंस्थाभारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या (बायो बबल) नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)कडून चौकशी सुरू आहे. अशातच कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट …
Read More »‘त्या’ खेळाडूंनी हॉटेलमध्ये खाल्ले बीफ?; बिलाचा फोटो होताोय व्हायरल
सिडनी : वृत्तसंस्था बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत मेलबर्नमध्ये झालेल्या तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत जोरदार कमबॅक केले होते, मात्र आत्मविश्वासाने भारलेला भारतीय संघ तिसर्या कसोटीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे. रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंना बायो बबलचे नियम मोडल्याने आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यातच आता या …
Read More »कोरोनविषयक कठोर नियमांमुळे टीम इंडिया हैराण; ब्रिस्बेनला न जाता सिडनीतच राहण्याचा निर्णय?
सिडनी : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर, तर चौथा सामना ब्रिस्बेन येथील मैदानावर होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू सराव करीत असतानाच चौथ्या कसोटीसंदर्भात मोठे वृत्त समोर आले आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतल्याचे वृत्त …
Read More »महेंद्रसिंह धोनी बनला ‘ग्लोबल’ शेतकरी
दुबईत पाठवणार शेतातील माल रांची : वृत्तसंस्थानिवृत्ती स्वीकारलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटनंतर काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे आणि आता त्याचा शेतातील माल थेट …
Read More »‘त्या’ चाहत्याला द्यावे लागले स्पष्टीकरण
मेलबर्न : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवले. एका चाहत्याने या चौघांचे बिल भरून टाकले. या प्रकारानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला पैसे घेण्याचा आग्रह केला, पण चाहत्याने पैसे न घेता केवळ सेल्फी क्लिक करवून घेतला. ही सारी कहाणी चाहत्याने …
Read More »तिसर्या कसोटीवर कोरोनाचे सावट
सिडनी : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर खेळला जाणार आहे, मात्र या तिसर्या सामन्यावर कोरोनामुळे संकट आले आहे. एका रिपोर्टनुसार तिसरी कसोटी एससीजीवर प्रेक्षकांविना खेळली जाऊ शकते. ब्ल्यू माऊंटेन, इलावारा या भागात कोविडचा प्रसार अधिक आहे, तर एससीजीपासून 30 किलोमीटर अंतरावरील बेराला आणि …
Read More »मयांक, विहारी ‘डेंजर झोन’मध्ये?
तिसर्या कसोटीत डच्चू मिळण्याची शक्यता सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून, युवा खेळाडू शुबमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने संघातील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे डच्चू कोणाला मिळणार याबाबत औत्सुक्य आहे.भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी …
Read More »आय्यान क्लब अंतिम विजेता
माणगाव : प्रतिनिधीमाणगाव येथे तीनबत्ती नाका मैदानावर आय्यान क्रिकेट क्लबतर्फे आय्यान चषकाचे आयोजन दि. 29, 30 व 31 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. स्पर्धेत यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव व रॉयल क्रिकेट क्लब बोर्ली संघात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघाने बाजी मारून प्रथम क्रमांकाचे रोख …
Read More »कसोटीसाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश
मेलबर्न ः वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश करण्यात आला आहे. दुसर्या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली होती. तो पुढील दोन्ही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हापासून यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper