अँटिगा ः वृत्तसंस्था एवीन लेव्हीसचे शतक (103) आणि शाय होपचे अर्धशतक (84) याच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विंडीजने पाच गड्यांच्या मोबदल्यात …
Read More »इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई सिटी विजेता
मुंबई ः प्रतिनिधी बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न साकारले. मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला 2-1 असे हरवत पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली. फतोर्डा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत डेव्हिड विल्यम्सने 18व्या मिनिटालाच मोहन बागानचे खाते खोलत आश्वासक सुरुवात केली, …
Read More »रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : भारताची द. आफ्रिकेवर मात
रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघावर 56 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू युवराज सिंग यांची झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 204 असा धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेला 7 बाद …
Read More »बुमराहच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम
तारा शर्माच्या पोस्टद्वारे शुभेच्छा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेली इंग्लंडविरुद्धची चौथी व अखेरची कसोटी खेळला नाही. 28 वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगले आहे, …
Read More »मोहोपाडा प्रीमिअर लीगवर अष्टविनायक संघाचे वर्चस्व
रसायनी : प्रतिनिधीरसायनीची महत्त्वाची बाजारपेठ असणार्या मोहोपाडा येथे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.या प्रीमिअर लीगमध्ये अमर धुरव यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना अष्टविनायक मोहोपाडा व शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. यात नाणेफेकीचा कौल शिवशक्ती संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व अष्टविनायक संघाला …
Read More »खराब सुरुवातीचा फटका
टी-20तील पराभवानंतर कोहलीची कबुली अहमदाबाद ः वृत्तसंस्थाटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवाने नाराज झाला आहे. पहिल्या टी-20मध्ये भारताची सुरुवात खराब झाली होती. पीच अनुकूल असेल तर तुम्ही पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळू शकता. आम्ही वेळ घेतला नाही. श्रेयसने वेळेचा योग्य वापर केला. हे पीच आमच्यासाठी नवखे …
Read More »अफगाणी खेळाडूने रचला इतिहास कसोटीत ठोकले पहिले द्विशतक
अबुधाबी ः वृत्तसंस्थाअफगाणिस्तानचा 26 वर्षीय खेळाडू हश्मतुल्लाह शहिदीने शेख झायेद स्टेडियमवर सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले. या कामगिरीसह हश्मतुल्लाह अफगाणिस्तानचा द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. आपल्या कारकिर्दीतील पाचवा सामना खेळणार्या हश्मतुल्लाहने 443 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 200 धावांची खेळी साकारली. हश्मतुल्लाहच्या द्विशतकी …
Read More »पहिल्या वन डेत विंडीजचा लंकेवर विजय
अॅटिग्वा ः वृत्तसंस्था वेस्ट इंडीज संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, उभय संघांतील टी-20 मालिका विंडीज संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना 49 षटकांत …
Read More »मिताली दस हजारी मनसबदार; 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू असून, त्यात मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने मैलाचा दगड …
Read More »आयसीसी क्रमवारीत ऋषभ पंतची गरूड झेप
दुबई ः वृत्तसंस्था अडखळत सुरुवात करणार्या ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया दौर्यापाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय कामगिरी करून जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. त्यातच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभने थेट सात स्थानांची झेप घेत थेट रोहित शर्मासोबत बरोबरी केली. भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज …
Read More »