पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चोळई नदीमध्ये उतरलेला एक कामगार पाण्याचा प्रवाह वाढल्याने घाबरून मध्यभागी झालेल्या बेटासारख्या भागामध्ये उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला अन्य कामगार नदीपात्रात कोलांट्या खाऊ लागल्याने घाबरून अत्यवस्थ झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत कशेडी घाटाच्या प्रारंभी चोळई गावाच्या मागच्या बाजूने वाहणार्या चोळई नदीपात्रामध्ये सोमवारी (दि. 8) दुपारी …
Read More »गोराई-बोरिवली, मालाड-मार्वे रोपवे प्रकल्प
शक्यता तपासणीसाठी कंपनीची नियुक्ती मुंबई : प्रतिनिधी – मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची स्थानकांवर मल्टी मॉडल इंटिग्रेशन प्रकल्प राबविणे, तसेच गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोपवे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस मंजुरी देण्यात …
Read More »विचुंबेत श्री संप्रदायाच्या सत्संग सेवा केंद्राचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त – विज्ञानाच्या क्रांतीतही मनशांतीसाठी अध्यात्माची गरज असतेच. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री संप्रदायाच्या उत्तर रायगड जिल्ह्याचा 139 वा सत्संग उद्घाटन सोहळा झाला. शनिवारी (दि. 6) विचुंबे येथे भव्य संत्संग केंद्राचा शुभारंभ व पालखी सोहळा झाला. सोहळ्यादरम्यान प्रवचनकार कुमारी प्रिया परब (सिंधुदुर्ग) यांचे प्रवचन झाले. यावेळी मान्यवरांसह …
Read More »ताडपत्री खरेदी करण्याची लगबग
उरण ः वार्ताहर – उरण तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी समाज मोठ्या संखेने वास्तव करीत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी आणि घरांची दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे. खेड्यातील काही घरांवर, गोठ्यासाठी, खिडकीच्या लाकडांसाठी, वाहन, पडवी आदी ठिकाणी प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीची गरज असते. त्यामुळे उरण बाजारपेठेत ताडपत्री खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. …
Read More »शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम
उरण ः रामप्रहर वृत्त – राज्य शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष या योजनेंतर्गत पागोटे ग्रामपंचायतीत शनिवारी (दि. 6) शालेय वस्तूंचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी उपसभापती वैशाली पाटील, जिप सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सरपंच भार्गव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना …
Read More »आजिवली येथे वृक्षारोपण उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल डॉक्टर प्रक्टिशनर असोसिएशनच्या वतीने अजिवली ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या परवानगीने अजीवली येथील शनिमंदिराच्या मागील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. पनवेल तालुक्यातील अजिवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. बाबुल, सीताफळ, पेरू, आंबा या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी …
Read More »माजी विद्यार्थ्यांकडून शाळेत वह्यावाटप
खारघर : प्रतिनिधी – परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे या ठिकाणी 1992-1993 मध्ये दहावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेविषयी आपुलकी दाखवत शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 6) कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत वह्यावाटप केले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्वदच्या दरम्यान पनवेल तालुक्यात मोजक्याच शाळा होत्या. यावेळी नावडे …
Read More »गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेलमधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात वह्यावाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 7) झाला. नवीन पनवेलमधील …
Read More »बेफाम पर्यटकांना प्रशासनाकडून नियमांचा लगाम
कर्जतचा निसर्ग पावसाळ्यात विशेष खुणावत असतो, त्यावेळी फेसळत कोसळत असलेले धबधबे, धरणे, पाझर तलाव, गडकोट यांची सफर आणि ट्रेकिंग यांना विशेष पसंती दिली जाते, पण सातत्याने होणारे अपघात यामुळे निसर्ग पर्यटनाची ठिकाणेही बंदीच्या कक्षेत आली आहेत. मागील तीन वर्षे सातत्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळी पर्यटनांवर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. यावर्षी …
Read More »पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका
पनवेल : प्रतिनिधी – खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र धबधब्यावर प्रवेशबंदी असताना, चोरवाटामार्गे धबधब्यावर जाऊन एका नाल्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांची सुटका खारघर पोलिसांनी केली. खारघरला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper