Breaking News

Ankit Shah

सुधागड पं. स.चा पुढचा सभापती भाजपचाच!

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार; पक्ष सदस्य नोंदणीला तालुक्यात जोरदार प्रारंभ पाली : प्रतिनिधी  – सुधागड तालुक्यात भाजप मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शनिवारी (दि. 6) पालीतील भाजप संपर्क कार्यालयात सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली.  तालुक्यातील शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख व पदाधिकार्‍यांनी अधिकाधिक सदस्य …

Read More »

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. जयश्री पाटील

पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण समारंभ नुकताच श्रीकृपा हॉल, खांदा कॉलनी येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या डीजीएन रोटेरियन रश्मी कुलकर्णी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोटरी कर्णबधीर शाळेतील मुलींनी अतिशय सुंदर गणेश वंदना सादर केली. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा वैशाली …

Read More »

दाखले वाटप शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त  – भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि पनवेल तहसील महसूल विभाग यांच्या वतीने मोफत सरकारी दाखले वाटप शिबिर शुक्रवारी (दि. 5) श्री कृपा हॉलमध्ये घेण्यात आले. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सरकारी दाखले मिळवण्यासाठी होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेता खांदा कॉलनी …

Read More »

दिघोडे ग्रामपंचायतीची वचनपूर्ती; घंटागाडीचे लोकार्पण

उरण : वार्ताहर – दिघोडे ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती, मात्र गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ही काँग्रेसची सत्ता उलथून भाजप शिवसेना शेकाप अशी आघाडीची सत्ता आली. या वेळी आघाडीतर्फे गावकर्‍यांना घंटा गाडीचे वचन दिले होते. आज या वचनपूर्तीसाठी सरपंच सोनिया घरत, उपसरपंच शारदा कासकर, मा. उपसरपंच प्रफुल्ल पाटील, कविता …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले

सरपंचपदी भारती चितले; तर उपसरपंचपदी मुकेश पाटील मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मुरकुटे यांच्या अथक परिश्रमाने भाजपने बाजी मारली असून ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी भारती हेमंत चितले या निवडून आल्या आहेत. उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात होऊन उपसरपंचपदी भाजपचेच मुकेश परशुराम मुरकुटे विजयी झाल्याने कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध ठिकाणी वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टी आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत गव्हाण, न्हावा, न्हवाखाडी, शिवाजीनगर, रा.जि.प शाळा बामणडोंगरी, पनवेल तालुक्यातील पेठाली, तळोजे मजकूर, तुर्भे, पिसार्वे येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कायक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या वेळी …

Read More »

वलगणीच्या मच्छीला मोठ्या प्रमाणात मागणी

उरण : वार्ताहर  – जोरदार पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील, तसेच नदीतील मासे शेतातील साठलेल्या पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. या वेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच वलगणीचे  मासे असे म्हणतात. वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशात अंडी (गाबोळी) हमखास असतात. त्यांना स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोलीवाले …

Read More »

चिरनेरच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरला अजगर

उरण : रामप्रहर वृत्त  – चिरनेर येथील सूर्यकांत म्हात्रे यांच्या फार्महाऊसवर असणार्‍या पोल्ट्री फार्ममध्ये शिरलेल्या एका अजगराला सर्पमित्र विवेक केणी आणि महेश भोईर यांनी पकडून त्याला इंद्रायणीच्या डोंगरात सोडून दिले. पत्रकार सूर्यकांत म्हात्रे यांचे चिरनेर गावात पोल्ट्री फार्म आहे. आज सकाळी ते पोल्ट्री फार्ममध्ये गेले असता त्यांना एक अजस्त्र अजगर …

Read More »

नवी मुंबई येथे गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा पुतळा

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली महापौर जयवंत सुतार यांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी  – नेरूळ से 28 येथे नवी मुंबईचे आकर्षण असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 30 फूट उंचीचा शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभेच्या आमदार . मंदाताई म्हात्रे यांनी …

Read More »

स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह पनवेल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक आयुक्त माधवी सुर्वे, विशेष अतिथी, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष …

Read More »