पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या 106 लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील सभा के. जी. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 28) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून प्रभाकर नवाळे यांनी कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 121 …
Read More »चांभार्लीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – रसायनी व आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रेगे हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 30) दुपारपर्यंत करण्यात आले होते. या शिबिराचा रसायनी व आसपासच्या परिसरातील 50 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी रेगे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तपासण्या करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात …
Read More »अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त कार्यक्रम
पनवेल : वार्ताहर – आशा की किरन फाऊंडेशन आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पनवेलमधील फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व ईद मीलनही झाले. कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक बशीर कुरेशी, एन. डी. खान, नूरजहा …
Read More »श्री अमरनाथ सेवा मंडळाचे बाबा बर्फानी यात्रेसाठी प्रस्थान
पनवेल ः वार्ताहर – यंदाच्या 26 व्या वर्षी श्री अमरनाथ सेवा मंडळ, पनवेलने आपली वैभवशाली परंपरा कायम राखत शुक्रवारी (दि. 28) पनवेल शहरातील विरुपाक्ष महादेव मंदिराचे आशीर्वाद घेऊन त्याची यथासांग महापूजा करून अमरनाथ यात्रेकडे प्रस्थान केले. गेल्या 25 वर्षांची या सेवा मंडळाची परंपरा असून ते दरवर्षी पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 …
Read More »अर्धवट पुलाच्या बांधकामाचा फटका
कच्चा रस्ता वाहून गेल्याने 10 किलोमीटरचा वळसा पनवेल : बातमीदार – केवाळे येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने काही नागरिकांना जवळपास 10 किलोमीटरचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे, तर काही वाहने याच धोकादायक पुलावरून ये-जा करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व ठेकेदाराच्या आळशीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. …
Read More »पनवेलकरांची पाणीटंचाई मिटण्याची शक्यता
पनवेल : बातमीदार – पनवेल महापालिकेचे देहरंग धरण शुक्रवारपासून भरून वाहू लागल्याने लवकरच शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल शहरात म्हणजेच तत्कालीन नगरपालिकेच्या साडेतीन चौरस किलोमीटरच्या हद्दीत महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला लागणार्या 26 एमएलडी पाण्यापैकी देहरंग धरणातून …
Read More »आपत्ती व्यवस्थापनसाठी कर्जतचे प्रशासन सज्ज
कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना पाहिली असता डोंगरदर्या आणि पावसाळ्यात ओसंडून वाहणार्या नद्या यांनी संपन्न असलेला तालुका आहे. पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळण्याच्या आणि सतत पाऊस कोसळत असेल तर नद्यांना पूर येण्याच्या घटना घडत असतात. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात राज्यमार्ग यांचे जाळे विणले गेले असल्याने रस्ते आणि रेल्वे यांच्याबाबत आपत्तीचे प्रसंग मोठ्या प्रमाणात …
Read More »असंघटितपणाचा शाप
देशात शेतीखालोखाल रोजगाराची संधी बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने देशभरातील ग्रामीण भागातील नडलेले, अशिक्षित, गरीब मजूर मोठ्या संख्येने कामाच्या शोधात शहरी भागांकडे स्थलांतर करीत असतात. त्यांची संख्या मोठी असल्यामुळेच त्यांच्या मजुरीच्या दरावरही परिणाम होतो. कामाच्या अनिश्चिततेमुळे व असंघटित असल्याने मिळेल त्या रोजगारावर हे मजूर काम करत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंबकबिलाही भटक्यांचे …
Read More »पेपरलेस कारभार एक भ्रम…
गेली काही वर्षे आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजिटलायजेशन वगैरेमुळे पेपर्स वापरण्याचे प्रमाण कमी होईल असे खरंच वाटत होते. मलाही बरे वाटले होते. पर्यावरण, झाडे वगैरे वाचतील हा विचार नंतरचा, पण टाईप केलेल्या कागदांचे ओझे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत …
Read More »अमेरिकेने चिंता करू नये!
अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरचे जे ताजे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यात भारतात धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, अशी टिप्पणी करण्यात आली आहे. गायीवरून मुसलमानांच्या हत्या होत आहेत. नगरांची मुसलमानी नावे बदलण्यात येत आहेत आणि एकंदरीत मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी धोरणे भारत सरकार राबवत आहे, असे मत व्यक्त करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper