Breaking News

Ankit Shah

म्हसळ्यात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा; रिक्त पदे भरण्याची मागणी

म्हसळा ः प्रतिनिधी – तालुक्यांत गट शिक्षण अधिकार्‍यांसह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर व उपशिक्षक अशी अनेक पदे रिक्त  आहेत. त्यामुळे म्हसळा तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे.  म्हसळा तालुक्यात एकूण 125 शाळा असून त्यात जि. प. प्राथमिक शाळा 102, माध्यमिक शाळा 20, तसेच खाजगी अनुदानित,  विना अनुदानीत व …

Read More »

पेण न्यायालयात मध्यस्थ कक्षाचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी  – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये मध्यस्थ मंडळ कक्षाचे उद्घाटन नुकतेच न्या. विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या मध्यस्थी कक्षाच्या वतीने न्यायालयात येणारी कौंटुंबिक प्रकरणे दाखल होण्यापूर्वीच तडजोडीने मिटविण्याची प्रक्रिया पार पडणार असून, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या कार्यक्रमास न्या. निनाद काकडे, मानसी …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू

श्रीनगर : वृत्तसंस्था  – जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती, …

Read More »

खालापूर-खोपोलीतील डेंग्यू रुग्ण सामान्य

एकत्रितपणे उपचारासाठी वावोशी येथे यंत्रणा उभारली खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  – खालापूर तालुक्यातील छत्तीशी ग्रामीण भागात असणार्‍या दहा गाव करंबेली येथे ‘डेंग्यू’ची लागण असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याने तालुका व जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. त्याचप्रमाणे खोपोली शहरातही काही रुग्ण निष्पन्न झाल्याने नगरपालिका आरोग्य विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात …

Read More »

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले

मुंबई : प्रतिनिधी  – मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. विकेण्डपासून सुरू असलेल्या या पावसाने रविवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू केली.सोमवारी सकाळपासूनच रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम दिसून आला. रेल्वे रूळांवर पाणी साचायला लागल्यामुळे गाड्या रांगायला लागल्या. मुंबईत सायन-माटुंगादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांची …

Read More »

पर्यटकांना खुणावतेय गाढेश्वर धरण

पनवेल : बातमीदार – पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित  होतात, मात्र मद्याच्या नशेत पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमावल्याच्या घटना दरवर्षी येथे घडत आहेत. त्यामुळे या वर्षी …

Read More »

रोटरी क्लब आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचा उपक्रम कौतुकास्पद -संजय कुमार

पनवेल : वार्ताहर – पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात येत असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आयोजित …

Read More »

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -डॉ. हेमलता वैशंपायन

उरण : वार्ताहर – निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून योगामुळे ताणताणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत. त्यामुळे आपले शरीर निरोगी होतेच त्याचप्रमाणे एकाग्रता वाढते. आहार व नियमित योगा हे महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक लाभ होतो. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या आहारात लक्ष ठेवले …

Read More »

विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी

पनवेल : प्रतिनिधी – कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड आणि तळोजा येथील रफ बटालियनचे असिस्टंट कमांडंट सुधीर सोनवणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. शनिवारी (दि. 29) कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ  …

Read More »

झाडे लावा झाडे जगवा…

खारघर शहरात वृक्षलागवड मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर शहरातील सेक्टर 1 कोपरा खाडी परिसरात के. बी. फार्म नर्सरी या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »