पनवेल : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी पार पडला. 2005 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी जयदास यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तब्बल 14 वर्षांनी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या …
Read More »मनपात स्वतंत्र प्रभाग कार्यालये
सिडकोकडून चार ठिकाणी भूखंडांची खरेदी पनवेल ः बातमीदार – प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी पनवेल महापालिकेने तयारी सुरू केली असून, स्वतंत्र प्रभाग कार्यालये उभारण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांची भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सध्या पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेली कार्यालये स्वतंत्र ठिकाणी असणार आहेत. 110 चौरस किलोमीटरच्या पनवेल महापालिका क्षेत्रात …
Read More »कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरले
कर्जत : रामप्रहर वृत्त – मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरल्याची घटना सोमवारी (दि. 1) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कर्जत ते लोणावळादरम्यान असलेल्या जामरुंग व ठाकूरवाडी रेल्वेस्थानकांच्या मध्ये ही घटना …
Read More »चाईल्ड फंड संस्थेची किमया
महाड : प्रतिनिधी – अवघ्या नऊ महिन्यात महाड तालुक्यातील 900 महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय निर्माण करून देणार्या चाईल्ड फंड संस्थेचे महिला सक्षमीकरण कामात महत्वाचे योगदान असल्याचे मत आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले. चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या ‘गरीबीतून समृद्धीकडे‘ या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन आमदार गोगावले यांच्या हस्ते नुकतेच महाडमधील …
Read More »माथेरान वीज वितरण कार्यालयात पाणी
कर्जत : बातमीदार – वीज वितरण कंपनीचे माथेरान येथील कार्यालय अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना पाण्यामध्ये राहूनच जनतेच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत. माथेरानमधील राजाराम साळुंखे रोड व पंचवटी नगरच्या बाजूला वीज वितरण कंपनीचे कार्यालय व कर्मचार्यांचे निवासस्थान आहे. नागरिकांची वीज बिल देयके याच कार्यालयात घेतली जातात. …
Read More »रायगडात वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ
अलिबाग : जिमाका – शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे गावाच्या परिसरात सोमवारी (दि. 1) जिल्हाधिकार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन, रायगड जिल्ह्यातील वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. लावलेले झाड हे माझे आहे, या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी …
Read More »ट्री हाऊस स्कूलची गो ग्रीन नर्सरीला भेट
पेण : प्रतिनिधी – येथील ट्री हाऊस स्कूल तर्फे ज्ञानवर्धक नेचर डेटिंग एज्युकेशन ट्रीप नुकतीच तारा (ता. पनवेल) येथील गो ग्रीन नर्सरी येथे काढण्यात आली होती. तेथे विद्यार्थ्यांना वृक्षांचे फायदे व पर्यावरणाचे संतुलन याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व निरनिराळ्या वेलींचा परिचय करून देण्यात आला. संस्थेच्या …
Read More »विजेचे जीर्ण खांब बदलावेत
कर्जत डेक्कन जिमखान्यातील नागरिकांची मागणी कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – पावसाळ्यात सडलेले लोखंडी विजेचे खांब पडून जीवित हानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करुन कर्जत डेक्कन जीमखाना परिसरातील नागरिकांनी, जीर्ण झालेले पोल बदलावेत, अशी मागणी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. नगरसेविका मधुरा चंदन -पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे …
Read More »नागोठण्यात पावसाची संततधार
नागोठणे : शहरासह विभागात पावसाची संततधार चालूच असून गेल्या चोवीस तासात नागोठणे शहरात 190 मि. मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तलाठी अनंत म्हात्रे यांनी दिली. रात्रभर पडलेल्या पावसाने नागोठणे – पोयनाड मार्गावर कडसुरे – कुहिरे गावांदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी सहा – सात वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली …
Read More »झाड कोसळल्याने खोपोली रेल्वेसेवा काही काळ ठप्प
खालापूर : प्रतिनिधी – लौजी व खोपोली स्थानका दरम्यान असणार्या फाटकाजवळ सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक महाकाय वृक्ष रेल्वे रुळांवर कसळला. त्यामुळे कर्जत -खोपोली रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. खालापूर, खोपोली परिसरात दोन दिवस संततधार पडत असून, त्यामुळे रेल्वे व महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper