Breaking News

Ramprahar News Team

निर्भयपणे मतदान करा; जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी लोकशाहीच्या राज्यकारभारामध्ये निवडणूक हा महत्त्वाचा घटक आहे. दर पाच वर्षांनी होणार्‍या निवडणुकीत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पेण येथे केले. सहाय्यक …

Read More »

रायगडात शिवसेनेचे सोशल इंजिनिअरींग; बॅ. अंतुले यांच्या जन्मगावी मुस्लीम मेळावा

अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्ह्यात सोशल इंजिनिअरींग सुरू केले आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहे. रायगडमधील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणार्‍या प्रचार सभांमध्ये मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागलेत. यामुळे …

Read More »

रायगडच्या विकासाला युती सरकारमुळे चालना; कृष्णा कोबनाक यांचा दावा

माणगाव : प्रतिनिधी रायगडच्या विकासाला केंद्र व राज्यातील युती सरकारमुळे चालना मिळाली असल्याचा दावा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी रविवारी (दि.14) माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.  ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत युती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे तसेच वैयक्तिक योजनेतून मिळालेल्या लाभामुळे आमच्या मतदारसंघातील जनता समाधानी आहे, …

Read More »

महाडमध्ये मतदान जागृती कार्यक्रमास प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी मतदान जागृती (स्विप) कार्यक्रमांतर्गत महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी (दि. 14) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा नियोजन अधिकारी व नोडल अधिकारी सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान …

Read More »

केंद्र सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीतेंचे चांगले काम -रवींद्र चव्हाण

रोहे ः प्रतिनिधी सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनहिताची कामे केली आहेत. या सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीते यांनी काम केले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे यासाठी अनंत गीते यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे केले. रायगड लोकसभा …

Read More »

अपघातात मुंबईचे चौघे गंभीर जखमी

नांदूरवैद्य ः प्रतिनिधी नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्विफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11.45 वाजेदरम्यान घडली. नाशिकहून मुंबईकडे जात असताना स्विफ्ट गाडी क्र. (एमएम 01 बीजी 1561) या गाडी चालकाचा समोर गतिरोधक असल्यामुळे ब्रेक दाबण्याच्या स्थितीत ताबा सुटल्याने समोरच …

Read More »

यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई ः प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने काल शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता …

Read More »

प्रेयसीला ब्लॅकमेल करणारा प्रियकर गजाआड

चेन्नई ः वृत्तसंस्था अल्पवयीन प्रेयसीचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देणार्‍या दोन युवकांना पोलिसांनी रविवारी अटक केली. पीडित मुलगी खासगी इंजिनिअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. चेन्नईत पल्लीकारानाय येथे राहणार्‍या जी. श्रीनाथ (20) नावाच्या मुलाबरोबर या मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमात असताना या मुलीने श्रीनाथला भरपूर गिफ्ट …

Read More »

‘बाटा’ला ठोठावला नऊ हजार रुपयांचा दंड

चंदीगड ः वृत्तसंस्था सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल बाटा इंडिया लिमिटेडला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंदीगडमधील एका ग्राहकाने पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल ‘बाटा’विरोधात तक्रार केली होती. ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत चंदीगड ग्राहक मंचाने ‘बाटा’ला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. …

Read More »

‘जेट’ वैमानिकांचे मोदींना साकडे; कंपनीतील 20 हजार नोकर्या वाचवण्याची साद

मुंबई ः प्रतिनिधी आर्थिक संकट कोसळल्याने ’जमिनीवर’ आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे, तर कंपनीतील 20 हजार नोकर्‍या …

Read More »