कर्जत : बातमीदार ठाणे येथील कराटे प्रशिक्षक व प्राचीन संरक्षण कलेचे अभ्यासक नासीर मुलानी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे टूर्नामेंटमध्ये कर्जतच्या मुला-मुलींनी विशेष प्रविण्य मिळवत एकूण 42 पदकांची कमाइ केली आहे. कर्जत येथील मेत्ता बुडोकॉन कराटे अकादमीचे प्रशिक्षक सुरज पंडित यांच्या मार्गदर्शनखाली अकादमीच्या 18 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला …
Read More »‘एक धाव इंडियन आर्मी’साठी! सैनिकांच्या सन्मानार्थ 1100हून अधिक महिलांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग
नवी मुंबई : बातमीदार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम स्टडिज् यांच्या संयुक्त विद्यमाने होत ‘एक धाव इंडियन आर्मी’साठी घोषवाक्य नजरेसमोर ठेवत महिलांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या 5 किमी मीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये 1100हून अधिक महिलांनी सहभागी …
Read More »भारताच्या इरफानला ऑलिम्पिकचे तिकीट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकले आहे. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील चालण्याच्या शर्यतीच्या इरफानने 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक आणि 2019मध्ये होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. विशेष म्हणजे इरफानला या स्पर्धेत …
Read More »महाडमध्ये शांतता समितीची बैठक
महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून येथील तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाची तयारी आणि लोकांनी मांडलेल्या सूचना यावर चर्चा करण्यात आली. महाडमध्ये 19 आणि 20 मार्च रोजी चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्ष साजरा होत आहे. याकरिता संपूर्ण राज्यभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने …
Read More »रायगड जिल्ह्यातील मजूर संस्थां अडचणीत
अलिबाग : प्रतिनिधी तीन महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याही मजूर कामगार सहकारी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक निकष पूर्ण केल्याचे अहवाल सादर केले नाहीत. तसेच सहाय्यक निबंधक यांच्या नोटीशींना उत्तरही दिले नाही. त्यामुळे या मजूर संस्थांना कामकाज सुरू ठेवण्यास स्वारस्य राहिलेले नाही, असा अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे रायगड …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकातून निर्माण नगरी जाणारा रस्ता बंद होणार? मध्य रेल्वे प्रशासनाच्या सूचना
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या कर्जत बाजूकडून बाहेर पडण्यासाठी दोन फुटाचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वे कोणत्याही खासगी संस्थेला असा रस्ता देत नसताना देखील निर्माण ग्रुप ऑफ कंपनीचा बोर्ड नेरळ स्थानकात झळकत आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या असून प्रवाशांनी पादचारी पुलाचा …
Read More »कर्जत तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होणार
कर्जत : बातमीदार शिरसे आणि पाथरज या कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका 24 मार्च रोजी होत आहेत. पाथरजमध्ये 10 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर गेल्यावेळी बिनविरोध झालेल्या शिरसे ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने तेथील निवडणुकीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी थेट सरपंच …
Read More »सीमावर्ती भागात महाराष्ट्र अन् कर्नाटक पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट ः सुहास वारके
सोलापूर ः प्रतिनिधी सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने महामार्ग, सीमावर्ती भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस प्रशासनाची एक बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातून होणारी गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात येत असल्याची माहिती …
Read More »कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक
मुंबई ः प्रतिनिधी सायबर ठकाने मिझोरमला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई येथे राहणार्या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. …
Read More »दहशतवाद-संवाद एकत्र राहू शकत नाहीत : सुषमा स्वराज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही, असे पाकिस्तानला त्यांनी खडसावले आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper