Breaking News

Ramprahar News Team

हिंमत असेल तर पाकिस्तानींना नागरिकत्व द्या : पंतप्रधान मोदी

रांची : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असे मी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम 370 लागू करून दाखवा. तिहेरी तलाकविरोधी जो …

Read More »

वेस्ट इंडिज संघाला दंड

चेन्नई : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने पहिल्याच वन डेमध्ये विजय मिळवला, मात्र या विजयानंतर त्यांना मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनाच्या 80 टक्के दंड केला आहे. चेन्नईत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात विंडीजने आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या …

Read More »

स्मृती मंधानाला आयसीसीचा बहुमान

दुबई : टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणार्‍या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून आयसीसी वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते. त्यातील एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही संघांत भारताच्या मंधानाचा समावेश करण्यात …

Read More »

लाराने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून, या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावत आहे. लाराने मंगळवारी (दि. 17) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या भेटीबाबत ट्विट करून …

Read More »

राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा, मुंबई उपनगरची जेतेदाची हॅट्ट्रिक; महिलांत पुण्याची सरशी

सोलापूर : प्रतिनिधी येथे झालेल्या 56व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात गतविजेत्या ठाण्याला नमवून विजेतेपदावर नाव कोरले, तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधताना पुण्यावर मात केली. हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर रविवारी (दि. 15) सायंकाळी झालेल्या पुरुष गटातील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत …

Read More »

टेनिसमध्ये फिक्सिंग; ‘टॉप-30’वर संशय

बर्लिन : वृत्तसंस्था जगातील टॉप-30 खेळाडूंमध्ये समावेश असलेले 135 खेळाडू हे तीन युरोपीय देश आणि अमेरिकेत सुरू असलेल्या मॅच फिक्सिंगच्या चौकशीत संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. टॉप-30मधील एका पुरुष खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा दाट संशय असल्याचे जर्मनीमधील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालातही म्हटले आहे. संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या या खेळाडूने तीन एटीपी टूर …

Read More »

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, सात ‘कांगारूं’ना डच्चू

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी 2020मध्ये भारत दौरा करणार असून, या दौर्‍यात तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा संघ मंगळवारी (दि. 17)जाहीर केला. या संघात नवोदित प्रतिभावंत फलंदाज मार्नस लाबूशेनला संधी देण्यात आली आहे, तर या वर्षी झालेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या सात …

Read More »

पनवेल : नील हॉस्पिटल येथे रविवारी मधुमेह संबंधित विनामूल्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर डॉ. कीर्ती समुद्र, डॉ. शुभदा नील, डॉ.निलेश बांठिया यांनी आयोजित केले होता. या शिबीराचा लाभ अनेकांनी घेतला.

Read More »

पनवेल : ‘आम्ही पोहेकर’ यांच्या 5 व्या शाखेचा उद्घाटन सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणिसिने अभिनेत्री अभिज्ञा भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, बिपीन जगपात आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘आम्ही पोहेकर’च्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता …

Read More »

खारघर : खारघर भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस गीता चौधरी यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, खारघर …

Read More »