Breaking News

Ramprahar Team

कल्पेश ठाकूर यांच्या हातून पुण्याचे काम होतच राहो -आमदार रविशेठ पाटील

पेणमध्ये देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन पेण : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना गेली 17 वर्षे विनामुल्य सेवा व कोरोना काळात मोफत रुग्णवाहिका पुरविणारे तसेच अन्नदान करणारे कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातही कल्पेश ठाकूर यांच्याकडून जनतेची सेवा करण्याचे पुण्याचे काम होत राहो, असे आमदार …

Read More »

अवकाळी पावसाचा अनेकांना फटका

नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आलिबाग : रामप्रहर वृत्त नुकताच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भातशेतीला बसला आहे. त्याचप्रमाणे आंबा, भाजीपाला व कडधान्य पिके तसेच विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात नुकताच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने विशेषत: खारेपाट भागात …

Read More »

पेणचे वैभव धनावडे साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित

पेण : रामप्रहर वृत्त नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पेणचे वैभव दिलीप धनावडे यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनावडे यांच्या ‘माझा एकलेपणा’ या चारोळी संग्रहाला पुण्यातील साहित्य गौरव या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. तो संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. …

Read More »

वरसोली समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियान

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था व स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, …

Read More »

पाल्हे येथे बहरतेय मानवनिर्मित कांदळवन

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील पाल्हे येथे खाडीकिनारी 20 हेक्टर क्षेत्रावर लावलेले मानवनिर्मित कांदळवन चांगले बहरत आहे. ओसाड जमिनीवर सागरी पर्यावरण बहरू लागले आहे. कांदळवनाच्या आधाराने स्थानिकांना चिंबोर्‍या, मासे पकडण्याचे साधन निर्माण झालेले आहे. झाडावर सुगरणीची घरटे दिसू लागले आहेत. यासह इतर पक्षांचीही किलबिलाट सुरू झाली आहे. वाढते औद्योगिकीकरण, शेतीसाठी कांदळवनाची …

Read More »

सुधागड लेणी : ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज

सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. तालुक्यात ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेण्यांचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशातील अभ्यासक येथे दौरेदेखील करत असतात, मात्र या प्राचीन लेण्यांकडे …

Read More »

विरोधकांचे स्वप्नरंजन

2014 साली देशातील सत्ता काबीज केल्यानंतर भारतीय जनता पक्ष संघटनात्मक पातळीवर इतक्या वेगाने वाढला की विरोधीपक्ष पूर्णत: निष्प्रभ झाले. अध्यक्षपदी असताना अमित शहा यांनी पक्षवाढीचे हे अफाट काम केले. त्याउलट प्रभावी नेतृत्वाअभावी याच काळात काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय होत गेली. पक्षाच्या या अवस्थेमुळे आज हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. …

Read More »

अवकाळी पावसामुळे पांढर्या कांद्याची पुनर्लागवड करण्याची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांना पांढर्‍या कांद्याची पुनर्लागवड करावी लागली आहे. त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजरात उशिरा येईल. अलिबाग तालुक्यातील कार्ले, सागाव, खंडाळा, वाडगाव या परिसरात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. अलिबाग तालुक्यात पांढर्‍या कांद्याचे 250 ते 300 हेक्टर पीक …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ साजरा

चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारणी सभा चौक सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक यांचा 2020 व 21 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत विशेष प्रावीण्याने उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

पायावर भिंत पडूनही दोन वर्षीय मुलाचे वाचविले प्राण

साक्षी दाभेकरला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले अपंगत्व प्रमाणपत्र अलिबाग : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकर हिला बुधवारी (दि. 8) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. 22 जुलैच्या दरड दुर्घटनेत साक्षी हिने जीवाची पर्वा न करता दोन वर्षीय मुलाचे प्राण वाचविले होते. याबाबत …

Read More »