इस्लामाबाद : वृत्तसंस्था न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्तब्ध झाले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -20 विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. दौरा रद्द …
Read More »रायगड प्रीमिअर लिगसाठी खेळाडूंवर बोली
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्या 25 वर्षा खालील खेळाडूंसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटीमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंचा नुकताच बोली पद्धतीने लिलाव (ऑक्शन) झाला. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये करण्यात आला. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा …
Read More »दिल्लीची हैद्राबादवर दणदणीत मात
दुबई : वृत्तसंस्था दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला. हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीच्या शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने या वेळी षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब …
Read More »अतुल झेंडे रायगडचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक
अलिबाग : प्रतिनिधी सचिन गुंजाळ यांच्या प्रशासकीय बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगडच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर अतुल झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी (दि. 21) पदाची सूत्रे स्वीकारली. अतुल झेंडे यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येथे कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यात माणगाव येथे …
Read More »विवाहितेवर बलात्कारप्रकरणी चुलत सासर्याला सक्तमजुरी
माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल पोलादपूर : प्रतिनिधी धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेवर तिच्याच चुलत सासर्याने तिचे अपहरण करून वरंध घाटातील एका टपरीमध्ये तसेच एका मंदिराच्या पडवीमध्ये तीनवेळा बलात्कार केल्याचा गुन्हा 13 जानेवारी 2018 रोजी घडला होता. याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 21) आरोपी चुलत सासर्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि एक …
Read More »रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचे धुमशान
माथेरान, नेरळ परिसर जलमय कर्जत : बातमीदार गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने तालुक्यात कुठेही नुकसान नाही, मात्र नेरळ आणि माथेरान परिसर जलमय झाला.दरम्यान,नेरळ गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसले असून या पावसाने अनेकांच्या घरातील किमती साहित्याचे नुकसान …
Read More »सुधागडातील प्रसाद भिलारेची फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत निवड
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील खेळाडू आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत असून कळंबोशी गावचा सुपुत्र प्रसाद देविदास भिलारे याची इंडोनेशिया नेपाळ आशियाई फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत 19 वयोगटात नुकतीच निवड करण्यात आली आहे. सध्या प्रसाद हा मिठागर फुटबॉल क्लब मुंबई या संघाकडून खेळतो आहे. फुटबॉलबरोबरच कराटेमध्येदेखील प्रसादने …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून प्रो कबड्डीपट्टू मयूर कदमचे अभिनंदन
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील बोकडवीरा गावचा गणेश क्लबकडून कबड्डी खेळणारा खेळाडू मयूर कदम याची प्रो कबड्डी लीगसाठी बंगळुरू बुल्स संघात निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी मयूरचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, …
Read More »पनवेलचा कुस्तीपटू शंकर जाधवला सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या शंकर सखाराम जाधव या विद्यार्थ्याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या नॅशनल स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यासोबतच दुबई येथे होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचा प्रतिनिधी म्हणून शंकरची …
Read More »नेरळ आदिवासी वाड्यांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कर्जत : बातमीदार नवी मुंबईतील श्री साई ट्रस्टकडून नेरळ भागातील चार आदिवासीवाड्यांमधील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या 109 आदिवासी विद्यार्थ्यांना श्री साई ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या डॉ. निर्मला राव, जयश्री जेठवानी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि खाऊ यांचे वाटप देण्यात आले. त्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper