Breaking News

Ramprahar Team

खालापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील शिरवली आदिवासीवाडीमध्ये बुधवारी (दि. 8) मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.  खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शाह यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित …

Read More »

खोपोलीतील विसर्जन घाटांची दुरुस्ती

खालापूर : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेने  शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच विविध प्रभागातील गणेश विर्सजन घाटाची दुरुस्ती व संरक्षण कठडे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे आणि खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या कामांची नुकतीच पाहणी केली. या वेळी …

Read More »

वरसोली ग्रामस्थांचा महावितरण अधिकार्यांना घेराव

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडाव्यात या मागणीसाठी वरसोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 8) महावितरणच्या चेंढरे येथील कार्यालयात जाऊन तेथील अभियंत्यांना घेराव घातला. वरसोली या ग्रामपंचायत हद्दीतील विद्यूत सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे दोन कर्मचारी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या दोन कर्मचार्‍यांच्या भरोशावर …

Read More »

गणेशमूर्तींबाबत ठोस धोरण हवे

गणेशमूर्ती बनविण्याबाबत शासनाचे ठोस धोरण नाही. त्यामुळे गणपती कारखानदारांचे नुकसान होत आहे. शासन शाडूमातीच्या मूर्ती बनविण्यास सांगते तर गणेशभक्तांची मागणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना असते. शाडूमातीच्या मूर्तीना मागणी नसल्यामुळे पेण परिसरातील गणपती कारखान्यांमध्ये मातीच्या लाखो मूर्ती पडून आहेत. राज्य सरकारने आता घरगुती गणेश मूर्तीसाठी दोन फुटांची तर सार्वजनिक मंडळांसाठी चार …

Read More »

आरोग्याचा श्रीगणेशा

काळोख्या रात्री अवघड वाटेवर मिणमिणत्या प्रकाशात एकेक पाऊल सावधपणे पुढे टाकत वाटचाल करावी तसे सारे जग तिळातिळाने पुढे सरकत असल्याचा भास होतो. अद्यापही अनिश्चिततापूर्णच भासणार्‍या वातावरणात पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी आला आहे. त्याचे श्रद्धापूर्वक स्वागत करायलाच हवे. संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया या ओळी त्यामुळेच …

Read More »

श्रेयवादाची विमाने उडाली

एखाद्या न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कुठल्या थराला जाऊ शकते याचे ताजे उदाहरण म्हणून कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाकडे बोट दाखवावे लागेल. विमानतळ उभारणी आणि त्याचे चलनवलन हा संपूर्णत: केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय असतो. त्याचा राज्याशी संबंध येतोच कुठे? कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टी भागात चिपी येथे …

Read More »

विविध मागण्यांसंदर्भात बीएमएसचे शासनाला निवेदन

मुंबई : रामप्रहर वृत्त संघटित व असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांच्या विविध प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस)वतीने बुधवारी (दि. 8) देशभर प्रत्येक राज्यात, सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कायालर्यावर धरणा, मोर्चा व निदर्शनांद्वारे कामगारांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करण्यात आले. त्यानुसार बीएमएस, रायगडच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच …

Read More »

रोह्यात नवजात बालक जखमी अवस्थेत आढळले

रोहा, धाटाव ः प्रतिनिधी दोन-तीन दिवसांच्या नवजात मुलाला निर्जनस्थळी झुडपात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 7) सायंकाळी रोह्यात कब्रस्तान परिसरात समोर आली. कब्रस्तानमागे कावळ्यांची गर्दी का झालीय हे पाहण्यासाठी ताबिश लद्द हा युवक गेला असता त्याला अर्भक दिसून आले. त्याने लगेच झुडपे बाजूला करून प्रथम बालकाला सुरक्षित केले. …

Read More »

एकल महिलांना धान्याचे किट वाटप

पनवेल महापालिका व सिप्ला कंपनीचा उपक्रम पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका आणि सिप्ला कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरोनामध्ये ज्या महिलांनी आपले पती गमावले अशा 200 एकल महिलांना बुधवारी (दि. 8) जीवनाश्यक धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेविका …

Read More »

मुरूडमधील सर्व पुलांचे मजबुतीकरण करा

अ‍ॅड. महेश मोहिते यांची मागणी मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पूल हे कमकुवत झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांनी प्रथम मुरूड तालुक्यातील सर्व पुलांचे मजबुतीकरण करावे, अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिला. …

Read More »