Breaking News

Ramprahar Team

पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सरसावले

दीड टन अश्वखाद्य माथेरानमध्ये दाखल कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांवरही रोजच्या खाण्याचे संकट ओढावले आहे. पर्यटन व्यवसाय थांबल्याने माथेरानमधील घोड्यांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के व त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे …

Read More »

पायरमाळ येथील रस्ता होणार चकाचक

नेरळ विकास प्राधिकरणातून 15 लाखांचा निधी मंजूर कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर पायरमाळ भागातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणाकडून 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथील ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्या …

Read More »

खरसई ग्रामपंचायत कर्मचार्याला मारहाण

म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचार्‍याला गुरुवारी (दि. 6) सकाळी मारहाण करण्यात आली. याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत भिंकू पयेर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. खरसई ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे एका भागातील पाणी बंद करून दुसर्‍या भागात …

Read More »

खोपोली बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहतुकीचीही कोंडी खोपोली : प्रतिनिधी 8 ते 12 मे या कालावधीत भाजी व फळ व्यापारी मार्केट बंद ठेवणार असल्याने, शुक्रवारी (दि. 7) खोपाली भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि या मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरातील वाहतूक …

Read More »

महाडमध्ये लसीकरणात सावळागोंधळ

महाड : प्रतिनिधी तरुणांच्या लसीकरणला महाडमध्ये जरी शुक्रवारी (दि. 7) मुहूर्त सापडला असला तरी लोकांची गर्दी, संभ्रम आणि गोंधळामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आली आहे. शनिवारपासून नियमीत लसीकरणाला सुरूवात होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे. महाड ग्रामीण रुग्णालयात 16 फेब्रुवारी 2021 पासून …

Read More »

बिकट वाट

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यावरच देशात कोरोना महासाथीची दुसरी लाट अनपेक्षितपणे येऊन आदळली. या दुसर्‍या लाटेत तरुणांमधील संसर्ग मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्याने 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणही सुरू करावे लागले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर नोकरी-व्यवसायात सक्रिय असणार्‍यांना फार काळ घरात ठेवून चालणार नाही. त्यामुळे या …

Read More »

कोरोनाविरुद्ध मोहिमेत ‘विरुष्का’चा सहभाग

दोन कोटींची मदत, इतरांनाही आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. ‘केट्टो’सोबत मिळून हे दोघे निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाईल. त्यांनी स्वतः दोन कोटींची मदतही केली …

Read More »

भारतात आयपीएल आयोजित करणे चुकीचे नव्हते : गांगुली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे भारतात आयोजन करण्यात कोणतीही चूक नव्हती, परंतु प्रवासामुळेच जैव-सुरक्षा (बायो-बबल) परीघ भेदले गेले, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. ‘सहा जैव-सुरक्षित परिघांमधील केंद्रांवर आयपीएलच्या आयोजनाची योजना उत्तम होती. जैव-सुरक्षित वातावरणातही कोरोनाचा शिरकाव कसा झाला याचे नेमके कारण …

Read More »

आयपीएलसाठी तीन पर्याय

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा दुसरा टप्पा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती (यूएई), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने …

Read More »

पेणमध्ये मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पेण : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे पेण तालुक्यातील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना नुकताच मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. क्लबचे प्रेसिडेंट शशिकांत भगत, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद पाठक, सेक्रेटरी राजेश मुळे, विरेंद्र पटेल, डायरेक्टर सुदर्शन शेळके, प्रशांत भगत, प्रांजल पाठक, हेमंत भगत, चेतन तांडेल, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे …

Read More »