Breaking News

Ramprahar Team

पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यालगतच्या महाकाय वृक्षांमुळे पावसाळ्यात धोका

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष पोलादपूर : प्रतिनिधी येथील पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दूतर्फा महाकाय वृक्ष आहेत. ते वादळवार्‍याने कोसळल्यास पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्यासह छोट्या हातगाड्या आणि टपरीव्यावसायिकांच्या जिवीताला तसेच मालमत्तेला धोका निर्माण होणार आहे. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दूर्लक्ष केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात पोलादपूर – …

Read More »

पेणच्या इनडोअर गेम हॉलमध्ये लसीकरण केंद्र

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा पुढाकार पेण : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची संख्या वाढत असून, येथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे लसीकरणाला येणार्‍या रुग्णांना संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून, शहरातील इनडोअर गेम हॉल लसीकरणासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली. …

Read More »

पाली, वावळोली सेंटरला सोयीसुविधा उपलब्ध करून देणार

आमदार रविशेठ पाटील यांचे आश्वासन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वावळोली कोविड केअर सेंटरला सोमवारी (दि. 19) आमदार रविशेठ पाटील यांनी भेट दिली. या दोन्ही ठिकाणी योग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी या वेळी दिले. आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी सुधागड तालुक्याचा …

Read More »

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात जिल्ह्यात अग्रेसर

खालापूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात अग्रस्थानी असून, या आरोग्य केंद्राने आत्तापर्यंत एक हजार 800 च्यावर 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करून कोविड विषाणूपासून भयमुक्त केले आहे. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अनिल शहा, त्यांचे सहाय्यक अधिकारी तसेच संगिता चव्हाण, भगत इत्यादी कर्मचारी कोविड लसीकरण करण्यात …

Read More »

अलिबागमध्ये आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुरुड : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर या संस्थेने नुकतेच झूमवर ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म‘ हा आहारावरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आहारतज्ज्ञ रंजना तत्ववादी यांनी समतोल आहार व मधुमेही व्यक्तींसाठीचा आहार या विषयावर व्याख्यान दिले, तर आहारतज्ज्ञ डॉ. भक्ती फफे पाटील यांनी हृदयविकार व उच्च …

Read More »

कर्जतमधील भाजी विक्रेते बाजारपेठेतून पोलीस मैदानात

कर्जत : प्रतिनिधी भाजीपाला घेण्यासाठी कर्जत बाजारपेठेत होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने येथील भाजी व फळे तसेच अन्य विक्रेत्यांना सोमवार (दि. 19) पासून शहरातील पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे  बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. कर्जत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भाजी व फळ विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसतात. …

Read More »

एकाची जमीन दुसर्याच्या नावावर

कर्जत तालुक्यातील घटना, शेतकर्‍याची न्यायालयात धाव कर्जत : बातमीदार तालुक्यातील गावंडवाडी येथील शेतकर्‍याने धारा भरताना सातबारा पहिला असता स्वतःची जमीन दुसर्‍याच्या नावावर झाल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे या शेतकर्‍याने थेट न्यायालयात धाव घेतली असून, कर्जत न्यायालयाने या घटनेचा तपास करण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत. मुंबईच्या जवळ असल्याने कर्जत तालुक्यातील …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या दुसर्‍या वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळपासूनच माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली. वीकेण्ड लॉकडाऊननमुळे माणगाव बाजारपेठेत दोन दिवस शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती. सोमवारी सकाळी आपल्याला लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी …

Read More »

रोह्यात 44 रुग्णांची वाढ

रोहे ः प्रतिनिधी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी (दि. 17) एका दिवसात 44 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रोह्यात  खळबळ उडाली आहे. ही वाढती आकडेवारी तालुक्याची चिंता वाढवणारी ठरली आहे. रोहा तालुक्यात 11 ते 17 एप्रीलपर्यंत एकूण 242 कोरोना रुग्ण आढळलेे असून, या कालावधीत 88 रुग्णांनी कोरोनावर …

Read More »

नेरळ, कळंब बाजारपेठा रविवारी बंद

कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. आठवडाभर निर्बंध आणि वीकेण्डला पूर्णतः लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे. तालुक्यातील नेरळ, कळंब, कशेळे, कडाव येथील बाजारपेठा शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणूंची साखळी खंडित करण्यासाठी …

Read More »