अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात नविन रास्त भाव दुकानांसाठी 236 जाहीरनामे प्रसिध्द करण्यात आले होते. यापैकी केवळ 81 प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 236 नवीन रास्त भाव दुकानांसाठी पुरवठा विभागाने जाहीरनामे प्रसिध्द केले होते. आलेल्या प्रस्तांवापैकी केवळ 81 प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. …
Read More »आषाणेतील वीज समस्यांबाबत मनसेकडून महावितरणला निवेदन
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आषाणे गावातील विजेच्या अनेक समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरण विभागाकडे लेखी निवेदन दिले आहे. गावाला वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र कोसळण्याच्या स्थितीत असून गावातील निम्म्याहून अर्धे विजेचे लोखंडी खांब गंजले आहेत. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश देवके यांची भेट घेऊन …
Read More »मुलीचा मारेकरी बाप पोलिसांच्या ताब्यात
खोपोली ः प्रतिनिधी बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना शुक्रवारी रात्री खोपोलीजवळ घडली. हत्या करून मुलीचा बाप बिहारमध्ये पळून गेला होता, मात्र खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग आणि पथकाने बिहारमध्ये जाऊन शनिवारी रात्री आरोपी बापास ताब्यात घेतले आहे. बिहार येथील एक कुटुंब 2 फेब्रुवारीला सकाळी खोपोलीतील …
Read More »भोरघाटात दरड कोसळली
सुदैवाने जीवितहानी नाही महाड ः प्रतिनिधी महाड-पुणे मार्गावरील भोरघाटात रविवारी (दि. 7) सकाळी भलीमोठी दरड कोसळल्याने काही काळ हा मार्ग बंद पडला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून या ठिकाणी काम करणारे ग्रामस्थ आणि ‘साबां’च्या ठेकेदाराने येथील दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. महाड-पुणे मार्गावरील भोर वरंध घाट दिवसेंदिवस धोकादायक …
Read More »शिवजयंतीनिमित्त भाजपची शिवगान स्पर्धा
‘सीकेटी’त रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी कर्जत ः बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ सेलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा अंतिम सोहळा किल्ले अजिंक्यतारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी …
Read More »पार्किंगअभावी पर्यटकांची गैरसोय
खोरा बंदरातील सुविधा उद्घाटनाविना; वाहने रस्त्यावर मुरूड ः प्रतिनिधी खोरा बंदरात नुकतेच एक कोटींचा खर्च करून 400 गाड्यांच्या क्षमतेच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे, मात्र काम पूर्ण होऊन दीड वर्ष झाले तरी अजून पार्किंगचा ठेका देण्यात आला नाही. परिणामी जागा असूनही पर्यटकांना आपल्या गाड्या रस्त्यावर लावाव्या लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांना …
Read More »फणसाड अभयारण्यात जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग
मुरूड : प्रतिनिधी जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी फणसाड अभयारण्यातर्फे दरवर्षी जळीत रेषा काढण्याचे काम केले जाते. रस्त्यालगत असणारे गवत अथवा झाडेझुडपे जाळून टाकली जातात, जेणेकरून वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण केले जाईल. त्या अनुषंगाने मुरूड येथील नवाबांचा राजवाडा परिसरात जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. या वेळी फणसाड अभयारण्याचे वनरक्षक अरुण पाटील, …
Read More »पाच तासांत 5555 जोर; पेणच्या अजय पाटीलचा विक्रम
पेण ः प्रतिनिधी हनुमान व्यायामशाळा पेण व श्री फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये जोर (हिंदू पुशअप) मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेण तालुक्यातील बळवळी येथील 26 वर्षीय अजय कमलाकर पाटील या तरुणाने पाच तासांत 5555 जोर काढून विक्रम प्रस्तापित केला आहे. रविवारी (दि. 7) सकाळी 7 वाजून …
Read More »सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश -मोहन काळे
कर्जत : प्रतिनिधी कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयाला महाराष्ट्रातील बेस्ट कॉलेज तसेच प्राचार्य डॉ. मोहन काळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अॅवॉर्ड मिळाल्याने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या अॅवॉर्डचे श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश मिळाले. यापुढेही असेच सहकार्य लाभल्यास आपल्या महाविद्यालयाचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास फार्मसी …
Read More »मच्छिमारांना होणार्या त्रासाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
संबंधित पोलीस अधिकार्यांना सूचना द्या; पनवेल व उरणच्या आमदारांची मागणी उरण : वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा गावातील मासेमारी करणार्या कोळी बांधवांना समुद्रात मासेमारी यांत्रिकी नौकांना त्रास सहन करावा लागत आहे. या होणार्या त्रासाबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper