Breaking News

Ramprahar Team

आदिवासीवाडीत दिनदर्शिकांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल-रायगड यांच्या वतीने एचओसी कॉलनी येथील आदिवासीवाडी व सिमरन मोटर्स येथील आदिवासीवाडी येथे वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे नूतनवर्षाच्या दिनदर्शिकांचे वाटप  करण्यात आले. या वेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा पनवेल शहर मंडलचे …

Read More »

बिल्डर धार्जिणा निर्णय

लॉकडाऊनच्या तडाख्याने विकलांग झालेल्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्याच्या हेतूने सर्व प्रकारच्या अधिमूल्यात (प्रीमियम) 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या आधी मुद्रांक शुल्कातही सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. अधिमूल्यातील सवलतीचा लाभ घेणार्‍या बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना घरखरेदीदारांचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विकासकांबरोबरच या भरघोस …

Read More »

दक्षिण नवी मुंबईसाठी सिडकोकडून ‘हेटवणे’तील पाणीसाठा आरक्षित

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे दक्षिण नवी मुंबईतील पाणी पुरवठ्यात वृद्धी करण्यासाठी हेटवणे धरणातील अतिरिक्त 120 दशलक्ष लीटर प्रती दिन (एमएलडी) पाणी साठा आरक्षित करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला रु. 119.80 कोटी शुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यात येणारी गावे, नोड आणि विविध प्रकल्पांना या …

Read More »

‘मूठभर शेतकर्यांच्या मदतीने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न’

मुंबई : प्रतिनिधी सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकर्‍यांचे नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकर्‍यांच्या मदतीने गेल्या 40 दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस …

Read More »

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णोपयोगी साहित्याची भेट

साळाव येथीलचव जेएसडब्ल्यू कंपनीचा उपक्रम रेवदंडा : प्रतिनिधी साळाव जेएसडब्ल्यू कंपनीने रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकताच बेबी वार्मर मशीन, अ‍ॅटोक्लव्ह, इसीजी मशीन, फ्लेटल डोपलर मशीन आदी साहित्याची भेट दिली. केंद्रातील कर्मचार्‍यांनी या आरोग्य साहित्याचा स्वीकार केला. साळाव जेएसडब्ल्यू  कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने सामाजीक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच …

Read More »

रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, खोपोली, माणगाव, पनवेलच्या धोदाणी गावामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (दि. 7) सकाळपासून ढगाळ वातावरण होते त्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. या अवकाळी पावसाचा फटका शेतकर्‍यांसह परिसरातील वीटभट्टीधारकांना देखील बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश झोडपून काढले, या वेळी वीजपुरवठा तालुक्यातील …

Read More »

कर्जतमध्ये हजारो क्विंटल भात उघड्यावर पडून

गोदामांच्या कमतरतेमुळे हमीभावाने भात खरेदीस अडचणी कर्जत : बातमीदार तालुक्यात कर्जत दहिवली मार्केट यार्ड, कशेळे  आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्रे आहेत. मात्र यंदा कशेळे आणि नेरळ येथील केंद्रे बंद असल्याने कर्जत येथील भात खरेदी केंद्रावर कामाचा ताण वाढला आहे. तेथे तालुक्यातील शेतकरी गर्दी करीत असल्याने भात खरेदी …

Read More »

कुणबी समाजाचा स्तुत्य उपक्रम

नागोठणे : प्रतिपादन रायगड जिल्ह्यात लग्नाचा हळदी समारंभ साग्रसंगीत करण्याची परंपरा आहे. या परंपरेला छेद देण्याचा स्तुत्य उपक्रम रोहे तालुक्यातील बाहे या गावात करण्यात आला.   बाहे गावात रोहे तालुका कुणबी युवक संघटनेचे अध्यक्ष अनंत थिटे यांच्या नातेवाईकाचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. लग्नाचा आदल्या दिवशी हळदी समारंभाच्या वेळी इतर कोणताही …

Read More »

वरंधा घाटांमध्ये चौदाचाकी टँकर फसला

आठ तास वाहतूक ठप्प महाड : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या वरंधा घाट रस्त्यावर माझेरी गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर  चौदाचाकी टँकर फसल्याने या मार्गावरील वाहतूक आठ तास ठप्प झाली होती. महाड – भोर – पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट गेल्या अनेक वर्षापासून धोक्याचा झाला आहे. मात्र पुणे, भोर, पंढरपुरकडे …

Read More »

रणधुमाळी ग्रामपंचायत निवडणूकीची

जिल्ह्यात 15 जानेवारीला मतदान तर 18ला मतमोजणी अलिबाग : जिमाका एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील …

Read More »