आरोग्य प्रहर संधिवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघेदुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून सुटका करून घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या डोके वर काढते. सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी …
Read More »माणगाव तालुक्यात 19 कोरोनाबाधित
माणगाव ः प्रतिनिधी जगभरात हाहाकार माजवणार्या कोरोना महामारीने रायगड जिल्ह्यातही धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्हा प्रशासनाची धावाधाव झाली आहे. कोरोना महामारीने माणगाव तालुक्यात कहरच केला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असली तरी तेवढ्याच प्रमाणात तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची …
Read More »रोहा बाजारपेठ हाऊसफुल्ल
अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गर्दी रोहे ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा बंद राहणार असल्याने अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला, किराणा माल व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवारी (दि. 15) शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोहा बाजारपेठेत आल्याने रोहा बाजारपेठ नागरिकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. रोहा शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रोहा, …
Read More »‘बिगिन अगेन’चे काय झाले?
महाराष्ट्रातील तीन चाकी आघाडी सरकारने बराच गाजावाजा करत राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा जरुर केली. परंतु त्यासाठी राज्यातील कोरोना परिस्थिती सुयोग्य हाताळणीने आधी पुरती नियंत्रणात आणायला हवी होती हे बहुधा त्यांच्या ध्यानात आले नसावे. एकामागोमाग एक अनेक महापालिका पुन्हा लॉकडाऊन पुकारित असल्यामुळे ‘बिगिन अगेन’चे काय झाले असा …
Read More »सततच्या लॉकडाऊनमुळे नागरिक हैराण
उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गाचे समूळ उच्चाटन करायचे असल्याने नागरिकांनीही लॉकडाऊनला व संचारबंदीला मोकळेपणाने जाहीर पाठिंबा दिला, मात्र दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन मात्र वाढतच गेला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा, उद्योगधंदे, व्यवसाय नियमानुसार बंद करण्यात आले. यामुळे दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. वारंवार लागू होणार्या …
Read More »आरसीएफ नोकरभरतीत स्थानिकांचाच विचार व्हावा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सीएमडींशी चर्चा अलिबाग ः प्रतिनिधी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे (आरसीएफ) अध्यक्ष व कार्यकारी संचालक (सीएमडी) निवास मुदगेरिकर यांच्याशी कर्मचारी भरती प्रक्रियेबाबत चर्चा केली. भरती प्रक्रियेत स्थानिक अलिबागकरांचाच विचार व्हावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली. …
Read More »रोहा तालुक्यात 11 कोरोनाबाधित
रोहे ः प्रतिनिधी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी तालुक्यात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत, परंतु त्याला यश मिळत नसून कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रोहा तालुक्यात मंगळवारी 11 कोरोना संसर्ग बाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोहा तालुक्यात आता एकूण सक्रिय बाधितांची संख्या 100वर …
Read More »सर्वाधिक रुग्णसंख्या पनवेलमध्ये; प्रयोगशाळा मात्र अलिबागमध्ये
राज्य शासनाचा अजब कारभार पनवेल ः बातमीदार आरटी पीसीआर ही महत्त्वाची एक कोटी सात लाख रुपये खर्चाची प्रयोगशाळा अलिबाग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना राज्य शासनाच्या एकाही बड्या अधिकार्याला कोरोनाकाळातील स्थितीचा विचार करण्यास वेळ मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार हा पनवेल …
Read More »पनवेल तालुक्यात 216 नवीन रुग्ण
191 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 14) 216 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 191 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत रुग्णांत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. मंगळवारी येथे 175 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 134 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले …
Read More »जीएमबीएफ ग्लोबल, महावीर आरोग्य संघाचे अतुलनीय कार्य
कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना दिलासा अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण आपले योगदान देत आहे. त्यामध्ये जीएमबीएफ ग्लोबल आणि महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी या संघाचेही योगदान नक्कीच दखलपात्र आहे. महावीर आरोग्य सेवा संघ हा मास्क ग्रुप संचलित आहे. या संघाचे संचालक प्रसाद दोशी आहेत. ते जीएमबीएफ ग्लोबल फोरम दुबईचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper