Breaking News

Ramprahar Team

पिंपळोली येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर

कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 10) पिंपळोली (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 150 हून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड नोंदणी केली.  ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रकांत निर्गुडा यांच्या हस्ते झाले. …

Read More »

पेण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ

पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील कुंभारआळी (प्रभाग क्रमांक 1) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक का. रा. पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजप कोकण विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, हितेश पाटील, …

Read More »

म्हसळ्यातील शिक्षकांनी घेतले केंद्र सरकारचे ‘निष्ठा‘चे धडे

म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्‍या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणाना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लीश …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटांत हाणामारी

13 जणांवर गुन्हा दाखल पेण ़: प्रतिनिधी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील दोन व दुसर्‍या गटातील एक असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील पाच व …

Read More »

आज नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री अय्यपा सेवा मंडळाच्या वतीने 23 वा अय्यपा महोत्सव आज रविवारी (दि. 12) साजरा करण्यात येत आहे. नागोठणे प्रभुआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर परिसरात कुनत्तूमना शशिकुमार नंबुद्री यांच्या हस्ते हा पूजा महोत्सव संपन्न होणार आहे. पहाटे पाच वाजता महागणपती होमाने या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला …

Read More »

नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनार्थ आज खोपोलीत रॅली

खोपोली : प्रतिनिधी भारतीय संविधानातील सर्व संसदीय कार्यप्रणालीचा अवलंब करून बहुमताने नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाला. या कायद्याच्या जनजागृती व समर्थनार्थ  जागरूक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 12) सकाळी 10 ते 12. 30 या दरम्यान खोपोलीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरूवात शहरातील फायर ब्रिगेड …

Read More »

मुरूडमध्ये उलटी-जुलाबाची साथ

डोंगरीत 50पेक्षा जास्त रुग्ण; आंबोली, एकदरातही बाधा मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावांत दूषित पाण्यामुळे उलटी जुलाबाची साथ सुरु झाली असून, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून, रुग्णांची काळजी घेण्यात यंत्रणा व्यस्त झाली आहे. डोंगरी, आंबोली व एकदरा या …

Read More »

प्रवाशांनी दिला तरुणांना चोप; ट्रॅव्हल्स बस चालकासोबत किरकोळ वाद

पनवेल : बातमीदार किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून खासगी ट्रॅव्हल बसच्या चालकाला मारण्यासाठी बसमध्ये घुसलेल्या तीन कॉलेज तरुणांना बसमधील प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी (दि. 7) रात्री कामोठे येथे घडली. कळंबोली पोलिसांनी तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मारुती मोरे हा बसचालक मुंबईतील वैभव ट्रॅव्हल्समध्ये …

Read More »

नोकरीचे आमिष दाखणार्याला पनवेल पोलिसांनी केली अटक

पनवेल : बातमीदार एलएनटी कंपनीमध्ये व्यवस्थापक असल्याचे भासवून नोकरीला लावण्याचे आमिष देऊन महाराष्ट्रातील इतरत्र भागातील बेरोजगार तरुण तरुणींना गंडा घालणार्‍याच्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पनवेलमधील एका जागृत पत्रकाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीच्या मुसक्या …

Read More »

जासईत चावडी वाचन व फेरफार अदालत

उरण : वार्ताहर महाराजेस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत  जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने जासई मंडळात ग्रामपंचायत हॉल येथे गुरुवारी (दि. 9) चावडी वाचन व फेरफार अदालत उरण तहसीलदार भाऊसाहेब …

Read More »