Breaking News

Ramprahar Team

खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत

खोपोली : प्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी सहाय्यता निधी म्हणून खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने जनकल्याण समितीला 12 हजार 251 रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी हर्डीकर, उपाध्यक्षा सुनीता पाटणकर, कार्यवाह अनिल रानडे, सहकार्यवाह वृषाली बेलसरे, खजिनदार सुधाकर भट, खजिनदार अंबादास पाठक, अपर्णा साठे, शशिकांत पाटणकर, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह …

Read More »

पेण तालुक्यात 796 दहीहंड्या फुटणार

पेण : प्रतिनिधी पेण शहर व तालुका परिसरात गोपाळकाळा मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा केला जातो. तालुक्यात यंदा एकूण 796 दहीहंड्या फुटणार आहेत. त्यात 271 सार्वजनिक, तर खाजगी 525 दहीहंड्यांचा समावेश आहे. त्यांची जय्यत तयारी गोविंदा पथकांकडून करण्यात आली आहे. येथील ललित पाटील मित्रमंडळातर्फे नगरपालिका कार्यालयासमोर यंदा एक लाख 11 …

Read More »

निवडणूक काळात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

दिव ग्रामस्थांचा प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी पूरग्रस्तांना तातडीने घरे देण्याचा निर्णय घेणारे, जनतेचे प्रश्न समजून घेणारे व सर्वसामान्याचा विकास साधणारे भाजपचे संवेदनशील सरकार असल्याचे प्रतिपादन भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी (दि. 21) दिव (ता. रोहे) येथे केले. रोहा तालुक्यातील कोकबन ग्रामपंचायत हद्दीतील दिव ग्रामस्थांनी बुधवारी …

Read More »

यशवंतखार येथे जनावरांना लसीकरण

रोहा : दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी कृषी कार्यानुभव अंतर्गत रोहे तालुक्यातील यशवंतखार गावातील 80 जनावरांना पायलागन रोगविरोधी लसीकरण केले. या वेळी पशुचिकित्सक डॉ. युवराज सुरकुले आणि परिचर दिवेकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांनी शेतकर्‍यांना लसीकरणाचे महत्त्व व फायदे पटवून दिले. या वेळी घेण्यात आलेल्या शिबिरात रोहा येथील कृषी विज्ञान …

Read More »

पेणच्या बाजारात दहीहंडीसाठी लागणारी आकर्षक मडकी

पेण : प्रतिनिधी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणच्या बाजारात रंगविलेली मातीची आकर्षक मडकी विक्रीस आली आहेत. त्याची खरेदीसुद्धा सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवाला सर्वत्र अनन्यसाधारण महत्त्व आहे. उंचच उंच थर लावून दहीहंडी फोडणे हे गोविंदा पथकांचे मुख्य आकर्षण असते. या दहीहंड्या फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके दोन महिन्यांपासून सराव करीत असून, दहीहंडी …

Read More »

पूरग्रस्तांना त्वरित भरपाई मिळण्याची मागणी

आगरी समाज विकास मंचाच्या वतीने निवेदन पेण : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पेण तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगरी समाज विकास मंचाच्या वतीने पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मंचाचे अध्यक्ष धर्माजी म्हात्रे, …

Read More »

नेरळ पंचवटी येथील रस्त्याचा एक भाग बंद

कर्जत : बातमीदार दरड कोसळण्याची भीती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसांपासून कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्याचा पंचवटी जिते फाटा वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-नेरळ-कल्याण मार्गावर जिते फाटा येथे असलेल्या खासगी टेकडीवर गेली काही वर्षे माती उत्खनन केले जात आहे. …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

रोहा : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा नववा वर्धापनदिन वसंत महाबळे यांच्या आंबेवाडी येथील  निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला. या वेळी  70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सन्मानपत्र, समई, ताम्हण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे चिटणीस अशोक कदम यांनी अहवाल व …

Read More »

नागोठण्यात रस्त्याला भगदाड; अपघाताची भीती

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी येथील नवीन पुलानजीक नागोठणे-पोयनाड मार्गावर उत्तर बाजूच्या रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ते बुजवावे, अशी मागणी केली जात आहे. नागोठण्याकडे येताना या रस्त्याला उतार असल्याने येणारी गाडी वेगाने खाली उतरत असते. त्याच्या बाजूला मोठी दरी असल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्यास या …

Read More »

कर्जतमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळेला भेट

कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या दहावीच्या 1981-82च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या शिरसे, तमनाथ व सांगवी येथील प्राथमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक आरओ वॉटर प्युरिफायर बसवून दिले तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले. या शाळेच्या केंद्रप्रमुख तसेच आठवण-82च्या सहकारी प्रतिभा साळोखे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर शिरसे आणि सांगवी शाळेला आठवण 82च्या वतीने …

Read More »