Breaking News

Ramprahar Reporters

राज्यातील धार्मिक स्थळे उद्यापासून होणार खुली

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने केली जात होती. प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने अनेकदा घंटानाद आंदोलनेही केली होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे कारण देत धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाकारण्यात येत होती. अखेर दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवार (दि. 16)पासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे …

Read More »

दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी आनंददायी व अनन्यसाधारण सण आहे. या सणाच्या अनुषंगाने फराळाप्रमाणे विविध साहित्य असलेल्या दिवाळी अंकांची निर्मिती केली जाते. दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 13) येथे केले.प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगड, अनिल …

Read More »

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टर्समध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले असून, तीन नागरिकांची मृत्यू झाला. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या सहा ते सात सैनिकांचा खात्मा करण्यात आला असून, 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानचे बंकर्स, …

Read More »

आपत्तीग्रस्तांना केंद्राची मदत

महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी निधी मंजूर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित देशातील राज्यांना निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना एकूण 4,381.88 कोटींचा निधी जाहीर करण्यात …

Read More »

‘निर्भीड लेख’चा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड

आमदार, महापौर आणि सभागृह नेत्यांचा ‘त्या’ नियुक्तीशी काहीही संबंध नाही! पनवेल : रामप्रहर वृत्त‘निर्भीड लेख’ने दिलेली बातमी संपूर्णत: चुकीची, दिशाभूल करणारी आणि लोकप्रतिनिधींवर अकारण आरोप करणारी आहे. मला महापालिकेतील तीन महिन्यांच्या सेवेसाठी आणि उपजिल्हा रुग्णालयातील आतापर्यंत झालेल्या सहा महिन्यांच्या सेवेसाठी माझ्या कंत्राटदाराकडून पगार मिळाला आहे, अशी स्पष्टोक्ती उपजिल्हा रुग्णालयातील सफाई …

Read More »

सत्तेच्या जोरावर दादागिरी करणार्‍यांची गय केली जाणार नाही

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा महाविकास आघाडीला घरचा अहेर रोहा : प्रतिनिधीरोहा आणि मुरूड तालुक्यात फार्मा उद्यान विकसित करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य शासनाने तशी अधिसूचना काढली आहे, मात्र या प्रकल्पासाठी आम्ही एकही गाव उठवू देणार नाही. वेळप्रसंगी रोहा तहसील कार्यालयावर मशाल मोर्चासुद्धा नेऊ, असा …

Read More »

धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीत अग्नितांडव

धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरोहा तालुक्यातील धाटाव येथील औद्योगिक क्षेत्रातील रंग तयार करणार्‍या नामवंत सुदर्शन केमिकल्स कंपनीतील एका प्लांटला बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की रात्री संपूर्ण परिसर आगीच्या तांडवामुळे प्रकाशमय दिसत होता. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सुदर्शन केमिकल्स कंपनीतील आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या …

Read More »

‘आत्मनिर्भर 3.0’ ची घोषणा

केंद्राचे कर्मचार्‍यांना दिवाळी गिफ्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटकाळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मदत पॅकेज जाहीर केले आहे. आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत रोजगार प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आली आहे. यात ज्या संस्थेत एक हजारांपेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी 12 टक्के ईपीएफओ व कंपन्यांचे ईपीएफओ …

Read More »

रायगडात 98 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक जणाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, बुधवारी (दि. 11) नव्या 98 रुग्णांची आणि एक जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 125 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 52 व ग्रामीण 14) तालुक्यातील 66, माणगाव नऊ, खालापूर सात, महाड पाच, रोहा चार, कर्जत व …

Read More »

‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

पनवेल : दै. रामप्रहरच्या दिवाळी अंकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, मार्केटिंग व्यवस्थापक दादाराम मिसाळ, …

Read More »