Breaking News

Ramprahar Reporters

कोळी बांधव आर्थिक संकटात

राज्य सरकारने मदत करण्याची अपेक्षा उरण : प्रतिनिधीआधीच पावसाळी हंगामातील दोन महिने मासेमारी बंदी, त्यानंतर खराब हवामानाबरोबरच मासेमारी सुरू करण्याच्या हंगामातच चक्रीवादळांच्या मालिकेमुळे सुमारे पाच-सहा महिन्यांच्या मासेमारीचा हंगाम पुरता वाया गेला असतानाच कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी लॉकडाऊनमुळे मासेमारी व्यवसाय मागील दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. …

Read More »

महाडमधील खासगी रुग्णालय सील

पॉझिटिव्ह महिला आढळल्याने खबरदारी; तीन डॉक्टर्सही क्वारंटाइन महाड ः प्रतिनिधीपोलादपूरमधील वयोवृद्ध महिला आजारी पडल्यानंतर तिच्यावर महाडमधील डॉ. म्हामणकर हॉस्पिटलमध्ये उपचार करून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असता ही महिला कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महाडमधील म्हामणकर हे खासगी हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. शिवाय या महिलेची तपासणी …

Read More »

रायगडात सलग दुसर्‍या दिवशी सहा नवे कोरोनाग्रस्त

पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 18) सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पनवेल तालुक्यातील चार आणि उरण व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पनवेल, उरण तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना दक्षिण रायगडमध्ये श्रीवर्धन आणि त्यानंतर पोलादपूरपर्यंत पोहोचला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या …

Read More »

हिमालयाच्या मदतीला धावला सह्याद्री!

स्वस्तातील स्वदेशी व्हेंटिलेटर बनविण्यात यश पनवेल ः प्रतिनिधी जगात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असताना तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून सोलर पॅनल क्लिनिंग रोबोट बनवणार्‍या आयसनमेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मूळच्या रायगड जिल्ह्यातील तीन तरुण इंजिनिअर्सनी …

Read More »

‘सहा महिन्यांसाठी मालमत्ता करमाफी जाहीर करावी’

अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मासिक बजेट कोलमडल्यामुळे राज्यात सहा महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराची भरपाई म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी सूचनाही आमदार डावखरे यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.भाड्याच्या …

Read More »

माणगावात मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांवर कारवाई

माणगाव ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करून जनतेला विविध सूचना सातत्याने करीत आहेत. तरीही अजूनही अनेक जण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. नागरिकांनी जास्तीत जास्त घरातच थांबून या विषाणूला पळवून लावावे, असे सरकार व प्रशासन नागरिकांना वेळोवेळी बजावत असतानाही काही नागरिक त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. …

Read More »

विनाकारण फिरणार्‍यांना उठाबशा काढण्याची शिक्षा

पेण पोलिसांनी घडविली अद्दल पेण : प्रतिनिधीसंचारबंदीतही विनाकारण फिरणार्‍या 22 ते 25 जणांना पेण पोलिसांनी उठाबशा काढणे व काही वेळ रस्त्यात बसण्याची शिक्षा दिली. कोरोनामुळे बाजारात गर्दी न करण्याचे तसेच विनाकारण न फिरण्याचे आवाहन पेण पोलीस सातत्याने करीत आहेत. तरीही काही तरी निमित्त काढून घराबाहेर पडणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी कारवाईस …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने यापुढेही प्रशासनाला सहकार्य करावे

आमदार महेश बालदी यांचे आवाहन उरण : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने एकदिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तशाच प्रकारचे सहकार्य लॉकडाउनच्या पुढील काळातही करावे, असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी मतदारसंघातील जनतेला केले आहे.मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर या शहरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या …

Read More »

एपीएमसीमधील आणखी एका व्यापार्‍याला लागण

नवी मुंबई : बातमीदारवाशी एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाजारातील अन्य व्यापार्‍यांसह माथाडी कामगार, वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी सानपाड्यातील पामबीचजवळ राहतो. त्याला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मसाला मार्केटमधील व्यापार्‍यास कोरोनाची लागण झालेली आहे.धान्य मार्केटमध्ये गुरुवारी डाळी आणि …

Read More »

रोहे, खोपोलीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू

रोहे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रोहेकरांनी आतापर्यंत लॉकडाऊन चालू झाल्यापासून प्रतिसाद दिला, परंतु आता लॉकडाऊन 3 मेपर्यंत गेल्याने रोह्यातसुद्धा नागरिकांनी या कालावधी टप्प्याटप्प्याने नियोजन केले आहे. रोहे-अष्टमीत 18, 19, 20 व त्यानंतर 25 एप्रिल दुपारी 2 वाजल्यापासून 26 एप्रिल पूर्ण दिवस, 27 एप्रिल आणि त्यानंतर 1 मे दुपारी …

Read More »