Breaking News

Ramprahar Reporters

रायगडात सहा नवे रूग्ण

पाच पनवेलमधील, तर एक श्रीवर्धनचा पनवेल, अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये पाच आणि श्रीवर्धन तालुक्यात एक असे एकूण सहा नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल, उरण तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता दक्षिण रायगडमध्ये पोहोचला आहे. या नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर पोहोचली आहे.  पनवेलमध्ये आढळलेल्या पाच …

Read More »

देशात 24 तासांमध्ये 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली, मुंबई : कोरोनामुळे 24 तासांत देशभरात 1 हजार 76 नवे रुग्ण आढळले असून 32 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याबरोबरच देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 हजार 835वर गेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारने वाढली असली तरी 15 ते 31 मार्चमधील रुग्णसंख्येची तुलना करता 1 एप्रिलपासून शुक्रवार (दि. 17)पर्यंत …

Read More »

मॉर्निंग वॉक करणार्‍या 66 जणांची खोपोली पोलिसांकडून धरपकड

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीकोरोनामुळे संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉक करणार्‍या 66 जणांना खोपोली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 17) ताब्यात घेतले. यामध्ये 63 पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.खोपोली शहरातील विविध रस्ते, मोकळे प्लॉट व मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध ठिकाणी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर व उपनिरीक्षक श्रीरंग …

Read More »

शेतकर्‍यांकडून हापूस थेट ग्राहकांच्या दारी!

सुधागडात कृषी विभागाचा उपक्रम पाली ः प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे आंबा बागायतदार शेतकरी फळाची विक्री करू शकत नाही आणि खवय्येदेखील हापूसपासून वंचित राहत आहेत. अशा वेळी शेतकर्‍यांकडून थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे काम सुधागड तालुका कृषी विभागाने करून दिलासा दिला आहे. आंबा बागायतदार शेतकर्‍यांकडून थेट ग्राहकांना फळविक्री करून सामाजिक बांधिलकी जपावी असे सुधागड येथील …

Read More »

पेण, महाड एमआयडीसीतील लॉकडाऊन शिथिल करावे

आमदार रविशेठ पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पेण ः प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. ते लक्षात घेता पेण आणि महाड औद्योगिक भागातील लॉकडाऊनचे निर्बंध अंशतः शिथिल करावे, अशी मागणी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली …

Read More »

तंदुरुस्त राहा आणि कोरोनाला पळवा!

कर्जत ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटामुळे अचानक लॉकडाऊन जाहीर झाले आणि सगळच तिथल्या तिथे थांबले. अनेक परप्रांतीय महाराष्ट्रात अडकून राहिले. रेल्वे पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रत्येक स्थानकावर सुरक्षेसाठी असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही अडकून पडले. कर्जत स्थानकातसुद्धा रेल्वे सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील व जिल्ह्यांतील 16-17 जवान आहेत. निरीक्षकांनी सर्वांचे जीवनमानच बदलण्याचा निर्धार …

Read More »

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजारांवर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3100वर पोहोचला आहे, तर आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यात 194 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. 83 टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ज्यांचे …

Read More »

पनवेल मनपाकडून नालेसफाईला सुरुवात

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीची दखल पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने बुधवार (दि. 15)पासून पनवेल शहरातील नालेसफाई करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात पुन्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिकेने दक्षता घेत तयारी …

Read More »

आदिवासींची रेशन कार्ड फाडली

कर्जतच्या गुडवण येथील दुकानदाराचा प्रताप कर्जत ः बातमीदारतालुक्यातील गुडवण वाडीमधील आठ आदिवासी धान्य घेण्यासाठी आले असता, त्यांची रेशन कार्ड दुकानदाराने फाडून टाकल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून कार्डअभावी रेशनवरील धान्य न मिळण्यास या आदिवासींची उपासमार होऊ शकते.गुडवण वाडीतील आठ आदिवासी हे रेशन घेण्यासाठी गुरुवारी (दि. 16) सकाळी गुडवण …

Read More »

कोरोनाचे वेगाने संक्रमण

इतर देशांच्या तुलनेत मात्र भारत सुस्थितीत नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढला आहे तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे, परंतु कोरोनविरोधातील लढाईत इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे. अमेरिका, इटली, जर्मनी, स्पेन यांसारख्या विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. दरम्यान, देशात ज्या …

Read More »