Breaking News

Ramprahar Reporters

भारताचा पहिला डाव 165 धावांत आटोपला

न्यूझीलंडला आघाडी, पण निम्मा संघ माघारी वेलिंग्टन : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 71.1 षटकांत 5 बाद 216 धावा केल्या असून, 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक तीन …

Read More »

शिवजयंतीचा उदंड उत्साह

पनवेलमध्ये भव्य मिरवणूक; मान्यवरांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी (दि. 19) पनवेल महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी शिवरायांच्या जयघोषाने पनवेल नगरी दुमदुमून गेली.शहरातील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास …

Read More »

जलतरणपटू प्रभात कोळीला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या शिरपेचात मानाचा तुरा पनवेल : रामप्रहर वृत्तराज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या 2018-19 वर्षांसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात राजू कोळी यालाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अवघ्या 20व्या वर्षी प्रभात कोळीने …

Read More »

वृक्ष लागवड ईश्वरी काम; चौकशीस तयार -मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधीदेवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे, असे सांगत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे. फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतर विद्यमान वनमंत्री …

Read More »

इंदुरीकर महाराजांचा माफीनामा

नगर : प्रतिनिधीप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबात इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.इंदुरीकर महाराजांनी महाराष्ट्रातील वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व महिलावर्गाला उद्देशून पत्रक जारी केले आहे. या माफीनाम्यात त्यांनी म्हटले की, माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य …

Read More »

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे. पक्षात सक्रिय असणार्‍या अनेकांना या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे.भाजपच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या. त्यामध्ये बूथ अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे दोन …

Read More »

गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्यास पनवेल मनपाच्या महासभेत मान्यता

पनवेल : प्रतिनिधीपावसाळ्यात नदीचे पाणी शहरात शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण महासभेत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या …

Read More »

कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकाप नेते विवेक पाटील याच्यावर गुन्हा दाखल

एकूण 76 जण आरोपी; अभिजित पाटील यांचाही समावेश पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार तथा कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेच्या संचालक मंडळातील 14 सदस्यांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये विवेक पाटील …

Read More »

चला हवा आली कामोठ्यात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विनोदी कलाकारांनी केली फुल टू धम्माल; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तकै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय, झेंडा सामाजिक संस्था, तसेच टीआयपीएल यांच्या वतीने चला हवा आली कामोठ्यात या मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 16) करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

अलिबागेत वैद्यकीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधीयेथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला लग्नाच्या भूलथापा देऊन विवाहित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी कन्हैया सिंग याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय …

Read More »