आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोच्या माध्यमातून रहिवाशांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 6) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक शिनगारे व अधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. सिडकोने आपल्या हद्दीतील विकासकामांवर भर देण्याची आग्रही मागणी आमदार बालदी यांनी या वेळी …
Read More »दुंदरे येथील महिलेला जाळून फासावर लटकवले; नातेवाईकांचा आरोप
भाजप प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडून सांत्वन; कारवाईची मागणी पनवेल : बातमीदारतालुक्यातील दुंदरे येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह 4 फेब्रुवारी रोजी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेला जाळून ठार मारून फासावर लटकवले असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची, तसेच औरंगाबादच्या सिल्लोड …
Read More »कार्यालयीन सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
अलिबागमधील प्रकार अलिबाग : प्रतिनिधीबांधकाम व्यावसायिकाकडून 21 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील सहाय्यक प्रशांत मांडलेकर याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 6) रंगेहाथ पकडले.प्रशांत मंडलेकर याचाविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या रायगडच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2 …
Read More »मराठा आरक्षणाला स्थगितीस ‘सर्वोच्च’ नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्थामराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि. 5) सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 17 मार्चला सुरू होणार आहे.राज्य सरकारने शिक्षण आणि …
Read More »शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसचा डाव : पाटील
पुणे : प्रतिनिधीकाँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळे सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जावी आणि महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, असे भाजपचे …
Read More »शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला का? कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अमरावती : प्रतिनिधीराज्यातील 75 टक्के शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने विदर्भ दौर्यावर असलेल्या शेट्टी यांनी बुधवारी …
Read More »विद्यार्थ्यांना गवसले यशाचे ‘क्षितीज’
रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि.4) आयोजन करण्यात आल होत. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रायगड जिल्हा …
Read More »खारघर-कोपरा पुलाच्या कामाची संयुक्त पाहणी
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : प्रतिनिधीजलवाहिनीच्या कामामुळे रखडलेल्या खारघर-कोपरा पुलाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 4) नवी मुंबई महापालिका आणि सिडकोचे अधिकारीर्यांसमवेत संयुक्त पाहणी केली. या वेळी यासाठी पाठपुरावा करणारे भाजप नगरसेवक व पदाधिकारीही उपस्थित होते.सिडकोच्या नियोजनाप्रमाणे खारघर-कोपरा येथे नवीन पूल …
Read More »अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी केंद्राकडून ट्रस्टची स्थापना
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराची निर्मितीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिल्याचेही त्यांनी सांगितले.राम मंदिर …
Read More »भारतीय हॉकी संघाची ब्रिटनवर मात
ऑकलंड : वृत्तसंस्थाकर्णधार राणी रामपाल हिने लगावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड दौर्यातील चौथ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनवर 1-0 अशी मात केली. या सामन्यात राणीने 47व्या सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला. या दौर्यातील न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper