संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला, तर सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येमधील बहुचर्चित जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (दि. 9) ऐतिहासिक निकाल दिला. त्यानुसार अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे, तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्यात येणार आहे. याबाबत …
Read More »फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पराभव : महमदुल्ला
राजकोट : वृत्तसंस्था बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्ला याने दुसर्या ट्वेन्टी-20 सामन्यातील पराभवासाठी फलंदाज दोषी असल्याचे म्हटले आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांच्या हाराकिरीमुळे बांगलादेशला पराभव पत्करावा लागला, असे महमदुल्लाने सांगितले. बांगलादेशच्या फलंदाजीबद्दल महमदुल्लाने सांगितले की, आम्हाला आमच्या फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही, पण फलंदाजीतील काही कमकुवत बाजूंवर अद्यापही मेहनत …
Read More »मुश्ताक अली क्रिकेट करंडक; महाराष्ट्राचा निसटता विजय
मुंबई : प्रतिनिधी गत उपविजेत्या महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटातील सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध आठ धावांनी निसटता विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने 15 षटकांत जेमतेम 6 बाद 104 धावांपर्यंत मजल मारली. अझिम काझी …
Read More »नेमबाज चिंकीला ऑलिम्पिक तिकीट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था युवा नेमबाज चिंकी यादवने शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करीत भारतासाठी ऑलिम्पिकची 11वी जागा निश्चित केली. चिंकीला पदकाला गवसणी घालता आली नसली तरी तिने आपल्या कारकिर्दीत पात्रता फेरीतील सर्वोत्तम 588 गुण मिळवत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तसेच …
Read More »भारताला हॉकी वर्ल्ड कपचे यजमानपद
सलग दुसर्यांदा बहुमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले आहे. त्यामुळे भारतात सलग दुसर्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता भारतात 13 ते 29 जानेवारी रोजी होईल, असे आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने (एफआयएच) कळविले आहे. त्याचबरोबर …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
राज्यपालांच्या निर्देशानुसार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 8) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. फोडाफोडीचे पुरावे द्या; अन्यथा माफी …
Read More »बांधणवाडीत मंदिर जीर्णोद्धार
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दी असलेल्या बांधणवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी आमदार बालदी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश बांधणवाडी ग्रामस्थांना देताना पुढील कार्तिकी एकादशीपूर्वी …
Read More »रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची व्यवस्था पाहून अभिनेत्री परिणीती चोप्रा बेहद खुश
पनवेल : प्रतिनिधी खेळासाठी पनवेलजवळ अद्ययावत, आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार सुविधायुक्त ठिकाण असेल असे वाटले नव्हते, पण उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये आल्यानंतर मी हे सगळे पाहून बेहद खुश झाले, असे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने म्हटले. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे काही चित्रिकरण आरटीआयएससीमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू …
Read More »बा विठ्ठला! राज्यातील शेतकरी सुखी व्हावा!!
चंद्रकांत पाटील यांचे साकडे पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या …
Read More »केपीएल मॅच फिक्सिंगप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना अटक
बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)दरम्यान पैसे घेऊन सामना निश्चिती (मॅच फिक्स) केल्याप्रकरणी कर्नाटकचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सी. एम. गौतम आणि माजी खेळाडू अबरार काझी यांना अटक करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये तीन मॅच खेळणारा, तसेच बेलारी टस्कर्स टीमचा कॅप्टन गौतम याच्यासह काझीला कर्नाटकच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper