Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल विधानसभा मतदारसंघात आजपासून भाजपच्या बैठकांचा धडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणूक जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने पनवेल मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतली असून, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागवार बैठकांचे आयोजन सोमवार (दि. 23)पासून करण्यात आले आहे. भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यानुसार सोमवारी (दि. 23) …

Read More »

रायगडात पावणेतीन लाख मतदार वाढले

अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये 22 लाख 65 हजार 478 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014च्या तुलनेत जिल्ह्यात दोन लाख 89 हजार 206 मतदार वाढले आहेत, अशी महिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 22) येथे दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर …

Read More »

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 22) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश चौक : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील पोतदार सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस …

Read More »

फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा विश्वास मुंबई : प्रतिनिधी राज्यात पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येणार असून, देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (दि. 22) व्यक्त केला. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा …

Read More »

सीकेटी विद्यालयात कराटे स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त जपान कराटे सोतोकाई 24वी राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 22) नवीन पनवेल येथील सीकेटी हायस्कूलमध्ये झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप नेते एकनाथ भोपी, पांडुशेठ केणी, आत्माराम पाटील, …

Read More »

रायगडच्या दोघांची वॉटरपोलो संघात निवड

पाली : प्रतिनिधी एशियन एज ग्रुप भारतीय वॉटरपोलो संघात रिलायन्स नागोठणे येथील राज विनायक पाटील व वेदांत उद्धव कुथे यांची निवड झाली आहे. खेडेगावात वास्तव्यास असलेल्या या खेळाडूंनी जलतरण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. त्यांना प्रशिक्षक दत्ता तरे यांचे मार्गदर्शन लाभले.  रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, …

Read More »

म्हात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

उरण : प्रतिनिधी आयईएस जवाहरलाल नेहरू विद्यालयात आयोजित  तालुकास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. त्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत म्हात्रे विद्यालयाची समीक्षा गावंड हिने थाळीफेकमध्ये प्रथम व गोळाफेकमध्ये द्वितीय, मन म्हात्रे याने थाळीफेकमध्ये प्रथम, ॠतिक पाटीलने उंच उडीत …

Read More »

दीपक पुनियालाही रौप्यपदकावर समाधान

नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था अमित पंघलपाठोपाठ भारताचा नवोदित कुस्तीपटू दीपक पुनिया यालाही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 86 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दीपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. पहिल्याच अजिंक्यपद स्पर्धेत दीपकने रौप्यपदकाची …

Read More »

टीम इंडिया मालामाल!

भत्त्यांमध्ये बीसीसीआयकडून दुप्पट वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या आणि परदेश दौर्‍यावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौर्‍यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. एका बातमीनुसार परदेश दौर्‍यावर असताना भारतीय …

Read More »