चेस्टर-ली-स्ट्रीट ः वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला 119 धावांनी धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 306 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 186 धावांमध्ये संपुष्टात आला. मार्क वूडने तीन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमची अर्धशतकी …
Read More »उपांत्य फेरीत भारत कुणाशी भिडणार?
बर्मिंगहॅमवर महामुकाबला होण्याची शक्यता बर्मिंगहम : वृत्तसंस्था न्यूझीलंड संघाचा पराभव करीत यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चार संघाची नावे जवळजवळ ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. न्यूझलंड नेटरनरेटमुळे उपांत्य फेरीत गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, …
Read More »अमूलकडून विराटला आशीर्वाद देणार्या आजींचा गौरव
मुंबई : प्रतिनिधी बांगलादेश आणि भारत यांच्यातला सामना सुरू होता तेव्हा, भारत जिंकावा म्हणून मी गणपतीची प्रार्थना केली होती असे या आजी म्हणाल्या. त्या पिपाणी वाजवून भारतीय संघाला चिअर करत होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलता पटेल असे या 87 वर्षीय आजींचे …
Read More »आरोग्यदूतांचा रविवारी सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्या व इतर रुग्णसेवा देणार्या डॉक्टरांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 1 जुलै हा दिवस सर्व …
Read More »शेकापसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (5 जुलै) सायंकाळी 4 वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे हा समारंभ होणार असून, या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी …
Read More »महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून …
Read More »रत्नागिरीत धरण फुटले
13 जणांचा मृत्यू, 10 लोक बेपत्ता रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (दि. 2) रात्री फुटले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 10 लोक बेपत्ता झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बचाव व शोधकार्य करीत आहेत. …
Read More »उरण भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन बुधवारी (दि. 3) येथील तेरापंत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात मतदार व पक्ष सदस्यांची नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्याचा …
Read More »रेवस येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले
अलिबाग : प्रतिनिधी रेवसनजीक कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज समुद्रातून बुडाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील आठ जणांना सुखरूप धरमतर बंदरावर आणण्यात आले. यारा शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे ‘पृथ्वीराज’ बार्ज कोळसा नेण्यासाठी मुंबईहून धरमतर येथे येत होते. रेवस बंदराजवळ आल्यानंतर या …
Read More »पिपाणीवाल्या आजी ठरल्या मॅन ऑफ दी वूमन!
लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला, पण या सामन्यात सार्यांचे लक्ष वेधून घेतले ते एका आज्जीबाईंनी. त्यांनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणार्या या आज्जीबाईंचे नाव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper