महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील नारीशक्तीला सक्षम आणि त्यांचा सन्मान करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केले असून भारतीय जनता पक्षाने फक्त विकास नाही, तर विश्वास देण्याचेही काम केले असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नवीन पनवेल …
Read More »मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केणी सिटीचे भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्त केणी सिटी ही भविष्यात सर्वांसाठी आदर्श ठरणार असून याकरिता भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.4) तळोजा फेज 1 येथे केणी सिटीच्या भूमिपूजनावेळी केले. या वेळी माजी नगरसेवक हरेश …
Read More »बॉम्बे टू गोवा @52; कुठूनही प्रवास सुरू करावा… मस्त धमाल..!!
उत्कृष्ट विनोदी चित्रपटाची व्याख्या काय? रात्री झोपेत जरी आठवला तरी चेहर्यावर मंद स्मित हास्य यायला हवे. सकाळी लवकर उठून त्यातील काही विनोदी प्रसंग यू ट्यूबवर कधी एकदा पाहतोय असं वाटायला हवे. आणि मग संपूर्ण दिवसभर ते धमाल प्रसंग डोळ्यासमोर येत येत आपला मूड फ्रेश रहायला हवा. बॉम्बे टू गोवा अगदी …
Read More »उरण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार; 100 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असतो, परंतु एखादा लोकप्रतिनिधी असा असतो की जो त्यामध्ये विशेष असे प्रयत्न करतो. काम, निधी मंजूर होण्यासाठी सातत्य, पाठपुरावा लागतो आणि ते आमदार महेश बालदी …
Read More »नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा
माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट …
Read More »शिक्षण जीवनातील सर्वांत मोठे अंग -पद्मश्री दादा इदाते
स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणाचे तत्त्व फार मोठे असून शिक्षण हे जीवनातील सर्वांत मोठे अंग आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिक्षणाचा पहिला आग्रह महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष व निती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपयांच्या विकासकामांचे गुरुवारी भूमिपूजन
मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 29) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकप्रिय …
Read More »रास्त भाव धान्य दुकानातून कमी धान्य
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे. नुकताच पनवेल विधानसभा …
Read More »दिघोडे खाडीपूल कोसळून दोन ठार; दोन गंभीर
उरण : तालुक्यातील धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतून मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासींच्या अंगावर पूल कोसळून दोन आदिवासींचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 26) सायंकाळी 7 वा. चे सुमारास घडली. धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत आदिवासी मासेमारीसाठी गेले असता खाडीवरील काँक्रिट पूल अचानक आदिवासीच्या अंगावर कोसळला. या अपघातात …
Read More »‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद
विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभाग आणि आय.क्यू. ए. सी. यांनी संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत शुक्रवारी (दि. 23) सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper