Breaking News

Pravin Gaikar

बंदिवानांनी ठेवला सर्वांसमोर आदर्श

बक्षिसाची रक्कम दिली पुलवामातील शहिदांच्या कुटुंबीयांना तळोजा : प्रतिनिधी : राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृह येथील बंदिवानांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिली. यामुळे त्यांनी एक आदर्श इतर बंदिवानांसमोर निर्माण केला आहे. त्यांच्या पारितोषिकाची रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्यामार्फत पुढे ती या कुटुंबीयांपर्यंत …

Read More »

माथेरानच्या जंगलाचे वनसंरक्षण आणि संवर्धन

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटिश काळापासून 100% प्रदूषण मुक्त आहे.त्यामुळे  येथील निसर्गरम्य वातावरण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 8 ते 10 लक्ष पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. माथेरान येथे पर्यटन हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. येथील सर्व विकासकामे ही वाहनांना बंदी असल्यामुळे मानवी श्रमशक्तीद्वारे केली जातात, त्यातही अनंत …

Read More »

शिक्षण ‘खुले’ होणार

किमान पाचव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे व स्थानिक भाषा, हिंदी भाषा व इंग्रजी अशा तीन भाषांची ओळख विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने व्हावी असे या धोरणात सुचवले आहे. दोन ते आठ या संवेदनशील वयात मुलांना स्थानिक भाषा वा मातृभाषेची ओळख व्हावी हा दृष्टिकोन त्यामागे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून त्याला प्रथम प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि …

Read More »

कोप्रोली स्वच्छता अभियान; गतिरोधकांना मारले पांढरे पट्टे

कोप्रोली : प्रतिनिधी : वारंवार होणारे अपघात या संदर्भात उरण पूर्व आणि मध्य या भागातील तरुणांनी एकत्र येऊन एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि त्याचबरोबर वाढणार्‍या गाड्या यामुळे रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे अपघात हे जणू उरणकरांच्या पाचवीलाच पूजले असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनातील …

Read More »

तळोजा सब-वेचे काम तातडीने पूर्ण व्हावे

पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज 1 येथील रेल्वे सब-वेचे काम दोन वर्षे धिम्या गतीने सुरू असल्याने या भागातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. या कामाला गती देण्याची मागणी तेथील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केली आहे. तळोजा फेज 1 या ठिकाणी शहरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी …

Read More »

वावंढळ-चौक परिसरात जनावरांची चोरी; शेतकरी चिंतातूर

रसायनी : प्रतिनिधी : भिलवले या भागात गेल्या दोन महिन्यांत, शेतकरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 20 जनावरे चोरीला गेल्याने येथील शेतकरी चिंतातूर झाला असून शेतीचा हंगाम जवळ आल्याने नांगरणीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वावंढळ येथील शेतकरी प्रकाश सखारामराव कदम यांचा एक बैल एप्रिलमध्ये चोरीला गेला, काही दिवसांनी दुसराही बैल चोरीला …

Read More »

‘कोपरा पुलावरील वाहतूक कोंडीवर पर्याय काढा’

खारघर : प्रतिनिधी : धोकादायक असल्याने सिडकोने कोपरा पूल वाहतुकीस बंद केला आहे, मात्र या निर्णयानंतर या ठिकाणी असलेल्या दुसर्‍या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने एका बाजूने वाहन गेल्याशिवाय दुसर्‍या वाहनांना मार्गक्रमण करता येत नसल्याने सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात सेनेच्या विभागप्रमुख मनेश …

Read More »

आपल्या आशीर्वादामुळेच यशस्वी झालो

उपमहापौर विक्रांत पाटील यांनी मानले मतदारांचे आभार पनवेल : वार्ताहर : 26 मे 2019 रोजी म्हणजेच 5 दिवसांपूर्वी मला आपल्या प्रभागाचा ‘नगरसेवक’ म्हणून निवडून येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. आपण भरभरून दिलेले प्रेम व आशीर्वाद यामुळेच मी संघर्षपूर्ण निवडणुकीत यश संपादित करू शकलो व नगरसेवक होऊ शकलो याची मला संपूर्ण …

Read More »

पंचायत समिती शेष फंड अंतर्गत अपंग कल्याण निधीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त : गव्हाण पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या पंचायत समिती शेष फंडांतर्गत अपंग कल्याण निधीचे वाटप नुकतेच करण्यात आले. न्हावा, गव्हाण, तरघर, उलवा या ग्रामपंचायत हद्दीतील अपंगांना गव्हाण ग्रामपंचायत हॉलमध्ये धनादेशाचे वाटप पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गव्हाणच्या सरपंच हेमलता …

Read More »