रोहे ः प्रतिनिधी : तालुक्यात रोहा आणि कोलाड पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकून गावठी दारू आणि ती तयार करण्याचे रसायन मिळून एकूण 10900 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहा तालुक्यातील कोलाड विभागात चिंचवली तर्फे आतोणे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी कोलाड पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी आरोपी (रा.चिंचवली तर्फे आतोणे, ता. रोहा) …
Read More »मानवनिर्मित वणवे वनविभागाची डोकेदुखी
अलिबाग : प्रतिनिधी : शेती, शिकार आदी कारणांसाठी जंगलात वणवे लावण्यात येतात.या मानवनिर्मीत वणव्यामंध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. दुर्मिळ वन्यजीवांच्या जाती देखील नष्ट होऊ लागल्या आहेत. अनेक उपाय करूनही वनवे थांबत नाहीत. हे मानवनिर्मित वणवे रायगड जिल्ह्यातील वनविभागची डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षी जंगलात वणवे लागतात. त्यात प्रचंड नकसान होत …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट
नगर : प्रतिनिधी : जातीच्या अंतासाठी लढणार्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी …
Read More »रेल्वे रुळावर पबजी खेळणे महागात; दोघे ठार
हिंगोली : प्रतिनिधी : पबजी गेमच्या वेडापायी हिंगोलीत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नागेश गोरे (वय 22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (वय 24) अशी मृत तरुणांची नावे आहेत. नागेश आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून पबजी गेम खेळण्यात दंग असताना दोघांना रेल्वेने चिरडले आणि त्यातच त्यांचा …
Read More »न्यूझीलंडमधील गोळीबारात सात भारतीयांचा मृत्यू
ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था : न्यूझीलंडमध्ये मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सात भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये हैदराबादमधील एक, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. अन्य तीन जण भारतीय वंशाचे आहेत. त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलगंणातील असल्याचे समजते. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदींमध्ये शुक्रवारी …
Read More »‘चौकीदार नरेंद्र मोदी’
पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरील नाव बदलले नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘चौकीदार’ हा शब्द अधोरेखित केला आहे. देशभरातील सभांमध्ये स्वतःचा ‘देश का चौकीदार’ असा उल्लेख करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरील …
Read More »रात्रीस खेळ… चाले हा…
नितीन देशमुख : पनवेल – दो भेल देना’, ‘एक भेल… कांदा टमाटर जादा’ …एकामागोमाग एक ऑर्डर्स सुरू असतात. भेळवालाही सगळे जिन्नस एकत्र करून झटपट भेळेची पुडी तयार करून देत असतो. मुंबईतल्या जवळपास सगळ्या रेल्वेस्थानकांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे चित्र दिसून येऊ लागलंय. भेळेला अचानक एवढी मागणी येण्याचं कारण डाएटच्या बाबतीत मुबईकरांमध्ये …
Read More »राष्ट्रवादी बोले, शेकाप डोले
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडात राजकारण आता चढत्या उन्हाप्रमाणे तापू लागले आहे. या वेळीही जिल्ह्यात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा रंगतदार सामना होणार आहे. युतीतर्फे अनंत गीतेंना या वेळीही उमेदवारी देण्यात आली आहे, तर सन 2014 मध्ये गीतेंकडून पराभव पत्करलेल्या सुनील तटकरेंना राष्ट्रवादीने पुन्हा मैदानात उतरविलेले आहे. त्यामुळे जुन्याच पैलवानांमध्ये …
Read More »लोकशाहीचा उत्सव
लोकशाहीप्रधान आपल्या देशात सातत्याने वेगवेगळ्या निवडणुका होत असतात. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीचे महत्त्व आगळे असते अन् स्वरूप भिन्न. या सर्वांमध्ये देशाचे भवितव्य ठरविणारी लोकसभा निवडणूक सर्वोच्च मानली जाते. यंदा 17व्या लोकसभेसाठी महासंग्राम रंगणार आहे. देशातील एकूण 543 मतदारसंघांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया होईल. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस असा मुख्य …
Read More »रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा हवा -शिवसेना
कणकवली : प्रतिनिधी : शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल, तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे. गोव्यातील उद्योजकांच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper