Breaking News

Pravin Gaikar

नवी मुंबईत मुलांच्या लसीकरणाला वेग

208 शाळांत केंद्रे; 36,821 जणांना पहिली तर 6,524 जणांना दुसरी पहिली मात्रा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासनाने 12 ते 14 वयोगटातील लसीकरणावर भर दिला असून मुलांच्या लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी …

Read More »

कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविले

पनवेल : प्रतिनिधी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या संदर्भात उल्लेखनिय व भरीव काम करणारे पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने मानाच्या ’राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अहमदनगर येथे शुक्रवार (दि. 22) झालेल्या समारंभात त्यांना आदर्श गाव योजनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, माजीमंत्री सुरेश …

Read More »

महावितरणचा वीज ग्राहकांना शॉक!

एकाच महिन्यात 2 वीजबिले माथी : रक्कम भरायची कुठून? ग्राहकांचा संतप्त सवाल उरण : बातमीदार महावितरणकडून वीज ग्राहकांना नेहमी एका महिन्याचे एकच वीजबिल येत असते मात्र चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात प्रत्येक ग्राहकाला महावितरणतर्फे दोन वीजबिले देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या बिलांच्या वाटपामध्ये एक नियमित वीजबिल तर …

Read More »

भीमरूपी महारूद्रा

पवनसुत हनुमंताचे नाव घेताक्षणी रामभक्तांच्या अंगावर भक्तिभावाने रोमांच उभे राहतात तर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो असे चित्र आता महाराष्ट्रात दिसू लागले आहे. हनुमान चालिसा या स्तोत्राची इतकी नावड शिवसेनेमध्ये कशी उत्पन्न झाली हे आता रहस्य उरलेले नाही. ज्या पक्षांसोबत शिवसेना सत्तेमध्ये खुर्चीला खुर्ची लावून बसली आहे, …

Read More »

पेण एसटी आगारात 100 टक्के उपस्थिती

ग्रामीण भागातही सेवा होणार सुरू पेण : प्रतिनिधी न्यायालय आणि राज्य सरकारने कर्मचार्‍यांना  कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधील जवळपास सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. विविध …

Read More »

रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा

लाभार्थी 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा 15 टँकरद्वारे भागवली जातेय तहान शासनदरबारी मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त रोहे : महादेव सरसंबे तालुक्यातील कुंडलिका नदीतीरावरील 26 गावांसाठी एमआयडीसीकडून 26 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील 13 गावांना सध्या पाणी मिळत नसल्याने तेथे एमआयडीसीकडून टँकरने पाणीपुरवठा केले जात आहे, मात्र पंचायत समितीकडे …

Read More »

अधिकार्‍यांना पाजले गढूळ अन् खारे पाणी

पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्या महिला आक्रमक पाली, पेण : प्रतिनिधी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशन व खारेपाट विभागाच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 21) पेण तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलकांनी उपस्थित अधिकार्‍यांना गढूळ व खारे पाणी पाजले. पेण विभागात भरपूर पाऊस …

Read More »

उरण आगारातील 90 टक्के बससेवा पूर्ववत

181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर उरण ः वार्ताहर मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील 193 कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामूळे 90 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021पासून राज्यातील एसटी …

Read More »

पनवेलमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती गठीत

एकूण 53 प्रकरणे मंजूर पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 20) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संजय …

Read More »

पनवेल प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नालेसफाई

नगरसेवक विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नाले आणि गटारांची दूरवस्था झाली होती. याबाबत नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करताच त्यांनी तातडीने या भागातील नालेसफाई करून घेतली. पाडा मोहल्ल्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक …

Read More »