Breaking News

Pravin Gaikar

मुरूडमध्ये ढगाळ वातावरण

आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. या हवामान बदलाचा परिणाम प्रामुख्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने …

Read More »

‘कुंडलिका‘ झाली प्रदुषित

नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी रोहे : प्रतिनिधी रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्‍या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्‍या नद्यांमध्ये  कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी …

Read More »

माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा माणगाव : प्रतिनिधी होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला  महाड येथे …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी भाजप कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त महिलांचे जीवनमान उंचावून त्यांचे सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चा कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी हळदी कुंकू समारंभावेळी केले. जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिलामोर्चा तालुका व शहर मंडळाच्यावतीने नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 20) हळदी कुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया …

Read More »

खारघरमधील पाणी प्रश्न पेटला

भाजप पदाधिकार्‍यांचा सिडको अधिकार्‍यांना घेराव खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर भाजपचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत रविवारी (दि. 20) थेट खारघर गोल्फ कोर्सवरच अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला. मागील काही दिवसांपासून खारघर शहराला सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 21) शिवजयंतीचे (तिथीनुसार) औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख हे प्रमुख वक्ते …

Read More »

उरण येथे शिवकालीन शस्त्र, दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन

उरण ः वार्ताहर मी उरणकर प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र व दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन सोमवारी (दि. 21) येथे भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला म्हाडा माजी सभापती राज्यमंत्री दर्जा बाळसाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. तर नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य महेंद्र पाटील, नगरसेवक …

Read More »

वडघरमधील रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून वडघर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. वडघर कॉलेज फाटा परिसर ते वडघर गावाच्या मध्यापर्यंत हा रस्ता तयार होत आहे. या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि. 21) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. या वेळी पनवेल भाजप महिला मोर्चाच्या पनवेल …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जितेंद्र म्हात्रे यांचा सत्कार

पनवेल ः वार्ताहर गोवठणे गावचे सुपूत्र जितेंद्र अनंत म्हात्रे यांना नुकतेच रायगड जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील अरिहंत सोसायटी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात समस्त पनवेल गुरुद्वाराच्या वतीने रायगड भूषण जितेंद्र म्हात्रे …

Read More »

पुलावरील लोखंडी प्लेट सरकल्याने अपघात

पनवेल ः वार्ताहर वाशी खाडीपूल या ठिकाणी दुचाकीवरून एक जण  सोमवारी (दि. 21) सकाळी कामावर जात असताना पुलावरील एक लोखंडी प्लेट बाजूला सरकल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन चालकाला पोलिसांनी तत्काळ मदत केल्याने पुढील अनर्थ टळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाशी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगळेकर यांनी पोलीस अंमलदारांना …

Read More »