Breaking News

Pravin Gaikar

ढाक डोंगरावरून भाविकांनी आणला गरुडध्वज

देऊळवाडीची यात्रा रद्द, दर्शन मिळणार कर्जत : प्रतिनिधी – तालुक्यातील देऊळवाडी येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतु …

Read More »

मुरूड पोस्टातील आधार कार्ड मशीन बंद

मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांना कमी दरात आधार कार्ड प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र सरकाराने सर्व पोस्ट कार्यालयांस आधार कार्ड मशीन पुरविल्या होत्या, मात्र अधिकार्‍यांच्या निष्काळजीमुळे मुरूड पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड मशीन गेले कित्येक महिने बंद अवस्थेत धुळखात पडली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आधार कार्ड हे महत्वाचे ओळखपत्र झाले …

Read More »

श्रीवर्धनमध्ये भाजपने रणशिंग फुंकले

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त – तटकरे कुटुंबीयांनी खासदार, आमदार व महत्त्वाचे पदे स्वत:कडे ठेवली आहेत, येथील युवकांना त्यांनी जाणीवपूर्वक डावलले आहे. भाजप त्यांची घराणेशाही संपवेल आणि रयतेचे राज्य आणेल, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी श्रीवर्धनमध्ये  केले. आगामी नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  श्रीवर्धन येथील सार्वजनिक …

Read More »

पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?

कटकारस्थानातून सत्तेवर आलेले तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार येत्या आठवड्याभरात कसेबसे एक वर्ष पूर्ण करेल. कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी कशीबशी आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचे भूत भेडसावू लागले आहे. त्यातच भरमसाठ वीजबिलांनी महाराष्ट्रातील जनता अतिशय जिकिरीला आली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नी वेळेवर सुयोग्य निर्णय घेण्याऐवजी गोंधळच अधिक घालणारे हे सरकार कधी …

Read More »

कोप्रोली भाजपतर्फे आमदार महेश बालदी यांना निवेदन

उरण : वार्ताहर – सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे वर्ग केलेल्या खोपटे ते चिरनेर रस्त्याचे रुंदीकरण होत असताना नाले व गटारांचा मुळप्रश्न उद्भवणार आहे. गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी हे नाले गावाच्या लगत असणार्‍या नैसर्गिक पाणलोट क्षेत्रात समाविष्ट करावे, असे निवेदन कोप्रोली भाजप शाखा व विभाग कमिटी यांनी आमदार महेश बालदी …

Read More »

अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्नेहकुंज’ आणि ‘करूणेश्वर’ येथे साहित्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश अरुणशेठ भगत यांच्याकडून नेरे पाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम येथे वॉटर डिस्पेन्सर मशीन आणि युवा नेते दशरथ म्हात्रे व भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल तालुका (ग्रामीण) यांच्या वतीने भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रम येथे वॉशिंग मशीन व रेशन …

Read More »

उरण, कामोठ्यात भाजपतर्फे वाढीव वीज बिलांची होळी

उरण : वार्ताहर – राज्यात महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या राज्य सरकारविरोधात वाढीव वीज बिलांची होळी करून प्रखर राज्यव्यापी आंदोलन सोमवारी (दि. 23) करण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुका …

Read More »

मॉर्निंग वॉकला जाणार्या गृहस्थाचा अपघाती मृत्यू

संतप्त ग्रामस्थांचा जासईत रास्ता रोको उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुक्यातील जासई-चिर्ले रोडवरून मॉर्निंग वॉकला जात असताना येथील गृहस्थ दत्तात्रेय जनार्दन ठाकूर (56) यांना अज्ञात वाहनाने रविवारी (दि. 22) सकाळी धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, …

Read More »

सानपाडा येथे बसला आग; एक जखमी; 35 प्रवासी बचावले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – पुण्याहून मुंबईला जाणार्‍या खासगी बसला आग लागल्याची घटना सानपाडा येथे घडली. कुरियरच्या कार्यालयासमोर बस थांबलेली असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून 35 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सायन-पनवेल मार्गावर शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आकांक्षा टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची बस मुंबईच्या दिशेने …

Read More »

शाळा सुरू; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

मोहोपाड्यात पालकांकडून संमतीपत्र देण्यास नकार मोहोपाडा : प्रतिनिधी – राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थीसंख्या कमी आहे. पालक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, मात्र मोहोपाड्यात रिलायन्स फाऊंडेशनची धीरूभाई अंबानी, सेंट जोसेफ, प्रिया, पिल्ले या शाळा बंद असून त्यांच्या अटी-शर्तीस पालकांचा नकार आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत …

Read More »