Breaking News

Yearly Archives: 2021

‘फायनान्शियल वेल्थ’च्या वाढीकडे आपले लक्ष का असले पाहिजे?

विकसित देशांमध्ये गेली अनेक दशके ‘फायनान्शियल वेल्थ’ वाढत गेली, तशीच ती सध्या भारतात वाढण्यास सुरुवात झाली आहे. या बदलाचे अनेक पैलू आहेत. ते एक देश म्हणून आणि गुंतवणूकदार म्हणून समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशातील वाढत्या डिजिटलायझेशनमुळे आर्थिक व्यवस्था पारदर्शी होऊ लागली आहे आणि त्याचाच पुढील भाग म्हणजे गुंतवणुकीचे मार्गही …

Read More »

फसवणूकप्रकरणी पनवेल शेकाप उपाध्यक्ष अब्दुल कच्छी गुजरात पोलिसांच्या ताब्यात

पनवेल ः वार्ताहर शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी यांना गुजरात राज्यातील पोलिसांनी फसवणूकप्रकरणी पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी (44)  यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा 420, 120 बीसह आयटी अ‍ॅक्ट …

Read More »

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘दिबांं’चा सरकारला अंतिम इशारा!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… 1984च्या आंदोलनानंतर सरकारशी वाटाघाटी झाल्या. त्या वेळी विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार …

Read More »

‘दिबां’च्या कर्मभूमीत होणार्‍या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे -आमदार प्रशांत ठाकूर

पेण ः दि. बा. पाटील 86व्या वर्षी आजारी असतानाही 2012 साली आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांची जन्मभूमी व कर्मभूमीत होणार्‍या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. त्यांचे नाव राज्यातील इतर प्रकल्पांना देता येईल, परंतु ‘दिबां’नी या भूमीसाठी …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी उरणमध्येही बैठक

उरण ः वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार व यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली उरण  तालुक्यातील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालयात शनिवारी (दि. …

Read More »

सिडकोवर धडकणार लाखो ‘दिबा’प्रेमी; 24 जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या भव्य व आदर्श मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधून वाहवा मिळवली. आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 24 जूनला सिडकोवर लाखो ‘दिबा’प्रेमी धडक देणार आहेत.  त्या अनुषंगाने …

Read More »

युरो कप : डेन्मार्कला हरवून बेल्जियम बाद फेरीत

कोपेनहेगन ः वृत्तसंस्था युरो कप चषक स्पर्धेत डेन्मार्कने जलद गोल झळकावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. बेल्जियमने डेन्मार्कचा 2-1ने पराभव केला. जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आले होते, मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसर्‍या सत्रात कमबॅक केले. दोन गोल झळकावत त्यांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. या विजयासह बेल्जियमचे बाद फेरीतील …

Read More »

1990 साली सरकारने काढलेल्या आदेशामुळे शेतकरी अधिकच भडकले

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना साडेबारा टक्के विकसित जमीन परत देण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी …

Read More »

माथेरान घाटात दरड कोसळली; पालकमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे सकाळीच रस्ता केला मोकळा

कर्जत ः बातमीदार माथेरान घाटात शुक्रवारी (दि. 18) पहाटे दरड कोसळली. या दरडीमुळे सकाळच्या वेळी नोकरदार तरुण आणि विद्यार्थ्यांची काहीशी गैरसोय झाली, मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा माथेरान दौरा असल्याने सकाळीच दरड रस्त्यातून बाजूला करण्यात आली. माथेरानच्या दस्तुरी नाका येथून पुढे 200 मीटर अंतरावर असलेल्या चांगभले मंदिर भागात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास …

Read More »

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसने मात्र आतापासूनच पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे, तर अवघ्या वर्षभरातच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. असे असताना मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस दिसू लागली आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधील आमदार झिशान …

Read More »