Breaking News

Monthly Archives: March 2022

पनवेलमध्ये कोविड योद्ध्यांना प्रशस्तीपत्रक

पनवेल ः प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर्स, एएनएम, जीएनएम, वॉर्डबॉय, डाटा एन्ट्री ऑपरेटर या कोविड योद्ध्यांना मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वाटप गुरुवारी (दि. 24) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले. दोन वर्षांपासून कोविड काळात आपल्या जीवाची …

Read More »

गव्हाण विद्यालयात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण

गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण शुक्रवारी (दि. 25) सुरू झाले. विद्यार्थी व पालकांचा या लसीकरण मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. …

Read More »

आपट्यातील तळे बनले कचराकुंडी

गावात घंटागाडी, पण कचरा तळ्याकिनारी रसायनी ः प्रतिनिधी रसायनी परिसरातील आपटा गावात पूर्वी सरदार बिवलकर यांनी ग्रामस्थांसाठी तळे निर्माण करून पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र सद्य स्थितीत य तळ्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. गावात ग्रामपंचायतीची घंटागाडी फिरत असूनही अनेक जण कचरा तळ्याच्या किनारी टाकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. …

Read More »

नवीन पनवेल पोलीस चौकीची दुरवस्था

चौकीच्या बाहेर खूर्ची टाकून बसण्याची वेळ पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्सजवळील पोलीस चौकीची दुरवस्था झाली आहे. चौकीतील भिंतीना तडे गेले असून चौकीत सर्व वस्तू अस्ताव्यस्तपणे पसरल्या आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणार्‍या पोलिसांनाच बसायला जागा नाही. त्यामुळे चौकीच्या बाहेर खूर्ची टाकून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. खांदेश्वर …

Read More »

कामोठ्यात भव्य मिसळ महोत्सव; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे भाजपतर्फे आयोजित भव्य मिसळ महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 25) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव 27 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये खवय्यांना वेगवेगळ्या चविष्ट मिसळींचा आस्वाद घेता येणार आहे. भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी आणि युवा नेते हॅप्पी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कांडपिळे गु्रपच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कांडपिळे गु्रपच्या वतीने पनवेलजवळील सुकापूर येथे नव्याने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. अजय कांडपिळे आणि गौरव कांडपिळे यांच्या या या पेट्रोल पंपाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 24) उद्घाटन झाले. पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, काँग्रेसचे …

Read More »

रोह्यातील लाचखोर सहाय्यक गटविकास अधिकारी जाळ्यात

रोहे ः प्रतिनिधी रोहा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित कौरू राठोड यांना 10 हजारांची लाच घेताना शुक्रवारी (दि. 25) कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने ही कारवाई केली. यामुळे रोह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्याविरोधात नवी मुंबईतील कोकण भवन येथे चौकशी सुरू होती. या चौकशीसाठी सहाय्यक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून अधिवेशनात पुन्हा ‘दिबां’च्या नावाचा गजर

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त आयुष्याच्या शेवटपर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी …

Read More »

द्रुतगती मार्गावर टेम्पो दरीत कोसळला; चालकाचा मृत्यू

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली हद्दीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी सिमेंट भरलेला आयशर टेम्पो सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. सिमेंट गोण्या भरलेला टेम्पो (एमएच-46,डिएम-7806) शुक्रवारी सकाळी बोरघाटातून मुंबईच्या दिशेने जात होता. खोपोलीजवळ ढेकू गावच्या हद्दीत आयशर टेम्पोने (एमएच-02,एफजी-1183) या सिमेंटच्या …

Read More »

कचरामुक्तीसाठी रायगड जि. प. प्रशासन सरसावले

अलिबाग ़: प्रतिनिधी वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड व कचर्‍याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ही समस्या कायमच सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. डम्पिंग व कचरा मुक्त गावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्टींग मशीनचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. …

Read More »