Breaking News

Monthly Archives: May 2022

फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना सुरू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील  वन्यजीव मोजणीस सोमवारी (दि. 16) सुरुवात करण्यात आली. अभयारण्यातील प्रत्येक प्राण्याची मोजणी व नोंद एका वहीत करण्यात येणार असून हा रेकॉर्ड काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे. फणसाड अभयारण्यामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीवांची मोजणी केली जाते.त्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून पाणस्थळांच्या ठिकाणी  काठ्यांची मचान बनवण्यात …

Read More »

माथेरान पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला सहा जणांच्या हरकती

कर्जत : बातमीदार एक जानेवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या 20 जागांसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आरखडा जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यांनी जाहीर केला आहे. या प्रारूप आराखड्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या संभाव्य आरक्षणास हरकती घेण्यात आल्या आहेत. माथेरान गिरिस्थान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. …

Read More »

भाजप नेते कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते बनोटी (म्हसळा) येथे समाज मंदिराचे उदघाटन

म्हसळा : प्रतिनिधी बदलत्या युगात तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे ते स्वीकारून नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या समाज मंदिराच्या इमारतीचा वापर करावा, असे आवाहन भाजप नेते कृष्णा कोबनाक यांनी सोमवारी (दि. 16) म्हसळा तालुक्यातील बनोटी येथे केले. चिंचबादेवी प्रासादिक भजन मंडळाने बनोटी येथे उभारलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन सोमवारी कृष्णा …

Read More »

खालापुरात अनेक पक्ष्याच्या प्रजाती बेघर

बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम खोपोली : प्रतिनिधी विकासाच्या नावाखाली खालापूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोङ झाली असून, वनसंपदेबरोबर वन्यजीव संपदेवरदेखील घाला घातला आहे. खालापूर तालुक्यातून राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पूणे द्रूतगती महामार्ग जातो. पाली-खोपोली, पेण-खोपोली, पळसदरी-कर्जत या राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रुंदिकरणाचे   कामदेखील झाले आहे. …

Read More »

खोपोलीतील गटारे, नाले, तुंबलेल्या अवस्थेत

 नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष खालापूर : प्रतिनिधी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.  मात्र खोपोली नगर परिषद प्रशासन पावसाळ्यापुर्वीची  नालेसफाई व वार्डातील साफसफाई करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात खोपोलीतील सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोपोलीत अत्यावश्यक सेवेबरोबरच मान्सूनपुर्व कामांकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. …

Read More »

सावित्रीतील उत्खननाने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत धोक्यात

सावित्री नदीपात्रातील राजेवाडी ते केंबुर्ली क्षेत्रात पर्यटन व नौकानयन क्षेत्र सुरू करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने सावित्री नदीपात्रात ड्रेझरद्वारे उत्खनन करण्यात येणार आहे मात्र असे झाल्यास सव ते राजेवाडी या आठ किलोमीटर पट्ट्यातील परिसरातील हजारो एकर भातशेती भविष्यात नष्ट होऊन नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विहिरी व बोअरवेल नष्ट होण्याची शक्यता असल्याने पर्यटनाच्या …

Read More »

दोन कारचा समोरासमोर अपघात; पाच जखमी

महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी महाड शहरानजीक सीमा गार्डन हॉटेलसमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही कारमधील एकूण पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक सीमा गार्डन हॉटेलसमोर रविवारी (दि. 15) दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई …

Read More »

श्रीसदस्यांकडून पनवेलमधील 27 गावांमध्ये स्वच्छता अभियान

पनवेल : वार्ताहर ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तसेच पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे समिती यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवारी (दि. 15) सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामस्वच्छता अभियानात श्रीसदस्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती …

Read More »

शिवसेनेचे हिंदुत्व खोटे

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जबरदस्त घणाघात मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंनी सभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टिकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले …

Read More »

नवी मुंबईतही प्रकल्पग्रस्तांचा आवाज बुलंद

विविध मागण्यांसाठी समितीची बैठक; पदाधिकार्‍यांची उपस्थिती नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या निर्देशानुसार येत्या 24 जून रोजी राज्य शासनाच्याविरोधात होणार्‍या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर 30 येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत स्वस्थ न …

Read More »