Breaking News

संपादकीय

टायगर जिंदा है!

1973 साली देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरूवात झाली तेव्हा देशभरात अवघे नऊ व्याघ्र संवर्धन प्रकल्प होते. आता ही संख्या 50 वर पोहोचली आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. एकंदर 72 हजार 749 चौ. किमीचे क्षेत्र या प्रकल्पांअंतर्गत येते. 2014 मधील 2226 वाघांवरून भारतातील वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 वर पोहोचली आहे. …

Read More »

पाण्याची शेती कशी कराल?

जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष पाण्याचीच शेती करण्याची वेळ आली आहे. ’पेरलत तरच उगवेल’ हा पारंपरिक शेतीचा मंत्रच या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. पाण्याची शेती, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल, हे संगण्यासाठीच पागोळी …

Read More »

गुणांचा फुगवटा नकोच

विद्यार्थ्यांना शाळांकडून गुणांची खिरापत मिळण्याचा एक मार्ग म्हणून नव्हे तर भाषा विषयांत लेखीप्रमाणेच तोंडी प्राविण्यही जोखले जाणे योग्यच ठरते. यासंदर्भात झालेल्या इतक्या गदारोळानंतर तरी आता मूळ हेतूकडे दुर्लक्ष न करता शाळांकडून योग्य तर्‍हेने गुणदान होईल अशी अपेक्षा आहे. कारण गुणांचा अवास्तव फुगवटा अंतिमत: विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण वाढवणाराच ठरतो. राज्य शिक्षण …

Read More »

मरीन जोसेफच्या यशाची गाथा

भारतीय प्रशासनातील सेवेतून खूप मोठे काम करता येते. प्रशासकीय सेवेतून आपल्याला समाजाची सेवा करता येते, उत्तम जीवन जगता येईल, असा पगार व सुविधा मिळतात, मान-सन्मान आणि प्रसिध्दी आपोआप येते. शिवाय निवृत्तीनंतरही भविष्याची चिंता उरत नाही. हे सारे तर आहेच शिवाय खूप काही वेगळे आणि मोठे काम करता येऊ शकते. अनेक …

Read More »

फक्त तारीख बदलली…परिस्थिती तीच

26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी होऊन माथेरानमध्ये निसर्गाचे व येथील लोकांचे खूप नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती 14 वर्षांनंतर होते की काय अशी भीती येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागली होती.14 वर्षांनंतर पुन्हा 2019च्या 26 जुलैला अतिवृष्टी सुरू झाली व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. जसजसा पाऊस वाढत होता तसतशा जुन्या आठवणी …

Read More »

जलसाक्षरतेची गरज

गेल्या वर्षी नीती आयोगाच्या अहवालानुसार 600 दशलक्षपेक्षा जादा लोक उच्च टोकाच्या पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे गेले असून दिल्ली, हैदराबाद, मंगळूर आणि चेन्नईसारख्या महानगरात आणखी एका वर्षात भूजल गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो पण हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. वाहून जाणार्‍या या पाण्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत …

Read More »

सिद्धी जगण्याची…

भिकारी म्हटल्यावर एक चिंध्या नेसलेली, अंगावर मळाची पुटं चढलेली, अंगाला वास मारणारी, अपंगत्व असेल तर ते मिरवणारी, राठ वाढलेल्या केसांच्या जटा मिरवणारी, ओंगळवाणी अशी स्त्री वा पुरुष असलेली व्यक्ती चटकन नजरेसमोर उभी राहाते आणि मग आपल्याही नकळत आपलेच अंग चोरले जाते. भिकारी आपल्या जवळपासही फिरकू नये अशी आपली इच्छा असते. …

Read More »

हिमा दास : बावनकशी सोने

महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भारताची प्रमुख शक्ती म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. नव्या पिढीमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे. आज असंख्य तरुण-तरुणी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करून स्वतःसह आपल्या देशाचा नावलौकिक वाढविताना दिसून येते. यामध्ये आता युवा धावपटू हिमा दासचे नाव समाविष्ट झाले आहे. हिमाने आपल्या अतुलनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उडनपरी’, …

Read More »

सबुरीचे राजकारण हिताचे!

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताज्या मुलाखतीने तो देश लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हे, तर सेनाधिकारी आणि त्यांनी घडविलेले वा स्वतंत्रपणे निर्माण झालेले आतंकवादी कसा चालवीत आहेत हे स्पष्टपणे दिसून येते आहे. ही एक स्पष्टोक्ती अशी आहे की ज्यामुळे भारताचे राजकारण अंतर्बाह्य ढवळून निघाले पाहिजे. काँग्रेस संस्कृतीने भारतावर प्रदीर्घ काळ राज्य …

Read More »

वन्यजीवांचे रक्षण

पावसाळ्यात ओला चारा खाण्यासाठी वन्यप्राणी माळरानावर येत असल्याने त्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. शिकारी आपली मर्दानगी मुक्या प्राण्यांवर बंदुकीच्या साह्याने गाजवीत अनेक प्राण्याच्या हत्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कधी मांस भक्षणासाठी, तर कधी कातडीसाठी किंवा नखे यांच्यासाठी वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहेत. सुधागड, पाली, खालापूर, तसेच कर्जतमधील जंगल …

Read More »