एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमोर दोस्तीचा हात पुढे केला आणि नव्याच वादाला तोंड फुटले. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या एमआयएमच्या ऑफरमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जायचा तो गेलाच. पूर्वीच्या काळी एमआयएमची अशी हिंमत तरी झाली असती का, या एकाच प्रश्नाचे उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वत:लाच प्रामाणिकपणे द्यावे. अंगार कोण आणि भंगार …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेकापची कोंडी
आगामी काळात रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषद आपल्या हातात असावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. सध्या जिल्ह्यात कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्ता काबिज करू शकत नाही, अशी राजकीय स्थिती असताना जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत …
Read More »कोरोनाचा पुन्हा धोका?
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा एकदा कोविड विषाणूने उगमस्थान असलेल्या चीन तसेच अन्य देशांमध्ये डोके वर काढले आहे. दक्षिण कोरियातही कोरोनाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी परत लॉकडाऊनची वेळ आली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. गेली दोन वर्षे पाठशिवणीचा खेळ …
Read More »आंबा बागायतदार संकटात
आंबा हा फळांचा राजा आहे, हे जगमान्य झाले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. कोकणातील हापूस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसून येतेय. बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. यंदा हापूस …
Read More »कालचा गोंधळ बरा होता!
विद्यार्थ्यांची भयग्रस्तता ओळखून तसेच कोरोना प्रतिबंधक काळजी स्वत:च्या शाळेत अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाईल या भावनेने बोर्डाच्या परीक्षांचे केंद्र पालक शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हा निर्णय घेतल्यानंतर परीक्षांमध्ये गैरप्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी विशेष उपाययोजनेची आवश्यकता होती. परंतु निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता यांची वानवा असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या …
Read More »पोलादपूर पंचायत समितीची आमसभा
महाराष्ट्रातील 29 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती आहे. पंचायत समिती मतदार संघाला गण असे म्हणतात. 17,500 लोकसंख्येचा एक गण असतो. लोकसंख्येनुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मतदार संघांच्या दुप्पट गण निर्माण केले आहेत. प्रत्येक गणातून एक सदस्य निवडण्यात येतात. मतदार प्रत्यक्ष मतदान पध्दतीने आपला प्रतिनिधी निवडून पंचायत समितींवर पाठवितात. …
Read More »दडवून ठेवलेल्या फाइल्स
दशकानुदशके काश्मीरमधील सत्य दडपले गेले अशा प्रतिक्रिया आपण अनेक ठिकाणी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पाहिलेल्या असतील, परंतु त्याचा नेमका अर्थ ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रभावीपणे सांगतो. असे चित्रपट मोठ्या संख्येने निर्माण व्हायला हवेत असे उद्गार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले याला फार मोठा अर्थ आहे, कारण नरेंद्र मोदी नावाच्या …
Read More »हाच खेळ उद्या पुन्हा
पाच राज्यांतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे चिंतन झाले, नेहमीप्रमाणे गांधी परिवाराने पायउतार होण्याची तयारी दर्शवली आणि नेहमीप्रमाणेच कार्यकारिणीच्या निष्ठावान सदस्यांनी त्यांचा न दिलेला राजीनामा फेटाळला. या पराभवामधून काँग्रेस पक्ष काहीही शिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले. फार पूर्वीच्या काळी जत्रेमध्ये तमाशाचे फड लागत असत, तेव्हा कुठल्या तमाशा …
Read More »कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव
भाद्रपद महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव आणि फाल्गुन महिन्यात साजरा होणारा होळीचा सण या दोनही सणांचे कोकणात किती महत्व आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र यंदा कोरोनाच्या भीतीचे सावट ओसरल्यामुळे मागील दोन वर्षांची कसर भरून काढायला होळकरी सज्ज आहेत. परिणामी प्रत्येक कोकणवासीय होळीला गावी जाण्यासाठी उत्सुक आहे. होळी… वाईट प्रवृत्तीचे थोडक्यात …
Read More »बाजार देतोय आणखी एक संधी
जगात उद्भवलेली युद्धस्थिती आणि त्यामुळे इंधनाची दरवाढ यामुळे भारताचे आर्थिक गणित बिनसणार, असे गृहीत धरून परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील पैसा काढून घेत आहेत, मात्र भारताच्या ग्रोथ स्टोरीवर ज्यांचा विश्वास आहे अशा भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारात नव्या दमाने गुंतवणूक सुरू केली आहे. या पडझडीत बाजार गुंतवणूकदारांना आणखी एक संधी देतो आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper