Breaking News

संपादकीय

गुंतवणूक जीवन विम्यापेक्षा वेगळी का आहे?

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com जानेवारीपासून अनेक जण करबचतीचा विचार करतात आणि त्यासाठी जीवनविमा काढतात. त्यातून करबचत होत असली तरी दीर्घकाळ विमा हप्ता भरण्याची बांधिलकी घेतली जाते. ज्या जीवनविम्यातून पुरेसा परतावा मिळत नाही त्याला गुंतवणूक म्हटले जाते, पण गुंतवणूक ही जीवनविम्यापेक्षा वेगळी आहे आणि ते याच काळात समजून घेतले पाहिजे. जानेवारी …

Read More »

गुंतवणूक केली, पण तिच्या नोंदींचे काय?

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com बँक खाती, जीवनविमा, म्युच्युअल फंड आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये सुमारे 82 हजार कोटी रुपये असे पडून आहेत, अशी एक आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. याचा अर्थ कोट्यवधी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीची पुरेशी काळजी घेत नाहीत असा होतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊन त्याच्या नोंदी करण्याची सवय लावून घेणे, एवढाच हे …

Read More »

सहकाराला केंद्राकडून गोड भेट

गेल्या 35 वर्षांपासून भिजत पडलेला साखरेबाबतच्या प्राप्तीकराचा प्रश्न केंद्रातील मोदी सरकारने गुरूवारी एका फटक्यात निकालात काढला. सहकारी साखर कारखान्यांना त्यामुळे मोठाच दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना होईल हे वेगळे सांगायची गरज नाही. देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी अर्थ मंत्रालयाशी सातत्याने …

Read More »

पाली शहरात खड्डे, धुरळ्याचा त्रास

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डम्परमधून उडणार्‍या व खड्ड्यांतून निघणार्‍या धुरळ्याचा खूप त्रास होत आहे. यामुळे येथे येणारे भाविक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. पालीतून होणार्‍या अवजड वाहतुकीमुळे खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व …

Read More »

सारे काही सत्तेसाठी

सत्तेवाचून तडफडणार्‍या काँग्रेसची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे झाली आहे. तर याच सत्तेपायी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था उतावीळ झालेली स्पष्ट दिसते आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळाची जबाबदारी झटकण्यासाठी तेथील काँग्रेस सरकार जे काही प्रयत्न करीत आहे, त्यास केविलवाणे हे एकमेव विशेषण उचित ठरावे. सत्ता …

Read More »

नफरतीचा कळस

पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाची काँग्रेस नेत्यांना इतकी प्रचंड अ‍ॅलर्जी आहे की मोदी हे नाव उच्चारताच त्यांचे माथे फिरते. याचेच प्रत्यंतर बुधवारी पंजाबमध्ये आले असे खेदाने म्हणावे लागेल. पंजाबमधील फिरोजपूर येथील सभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांचा ताफा निघाला असताना हुसैनीवाला येथे तथाकथित किसान आंदोलकांनी रास्तारोको केला. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक …

Read More »

पेण, माणगावात क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील सावरसई येथील शासकीय व उच्च माध्यमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, जयसपाल सिंह मुडा यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुणे नीरा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.  शाळेचे मुख्याध्यापक एच. …

Read More »

बाळशास्त्री जांभेकर : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक

इंग्रज राजवटीत मराठी वर्तमानपत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान दर्पणकारांना जातो. चिपळूणकर, टिळक, आगरकर, न्या. रानडे यांचे कर्तृत्वपर्व सुरू होण्याआधी ज्या लोकोत्तर महापुरुषांनी महाराष्ट्राची सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक जीवनाची पायाभरणी केली, त्यांच्यात कै. बाळशास्त्री जांभेकरांचे नाव सर्वोच्च …

Read More »

शेजार्याची डोकेदुखी

माणसाला एकवेळ स्वतःचा जोडीदार निवडता येतो, पण शेजारी निवडता येत नाही. तो नशिबात असेल तसा स्वीकारावा लागतो अशा आशयाची इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. त्याचा अनुभव गेली पन्नासहून अधिक वर्षे भारताने घेतला आहे. आपला शेजारी चीन याच्या रूपाने एक जुनी डोकेदुखी पुन्हा एकदा ठणकू लागली आहे असे दिसते. गेल्या दीड …

Read More »

वर्षारंभीही चिंता कायम

जुने वर्ष सरून नवे वर्ष सुरू झाले आहे. यंदा नववर्षाच्या स्वागताचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. याचे कारण दुसरे तिसरे काहीही नसून कोरोना हेच आहे. गेली दोन वर्षे या वैश्विक महामारीने जगभर वाताहत केली असून हे संकट थांबायचे नाव घेत नाहीए. उलट नवनवी रूपे घेऊन कोरोना डोके वर काढत आहे. …

Read More »