Breaking News

संपादकीय

ग्रीन हायवेसाठी त्रुटी दूर करणे आवश्यक

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग 548अ हा ग्रीन हायवे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या रस्त्याबाबत अनेक त्रुटी असून त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीबाबत अजूनही स्थानिक बाधित शेतकरी चिंतेत आहे. राष्ट्रीय महामार्ग 548अ हा कर्जत तालुक्यातून जात असून नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर …

Read More »

विद्यापीठांची वासलात

नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणार असून त्यामुळे विद्यापीठांचे नजीकच्या काळातच संपूर्ण वाटोळे होईल असा हल्ला भारतीय जनता पक्षाने चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा विद्यापीठ कायदा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी घाईघाईने का मंजूर करून घेतला याचे कारण समजून घेतले पाहिजे. विद्यापीठ कायद्यामध्ये नवी कलमे जोडण्याच्या …

Read More »

मेजवानी पोपटीची…

रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीचा भाग बनलेल्या पोपटीचा मोसम सुरू झालाय. आता थंडी संपेपर्यंत म्हणजे अगदी मार्चअखेरपर्यंत हा सिलसिला सुरू राहील. रायगडची ओळख व इतर ठिकाणच्या खवय्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेल्या या चविष्ट पदार्थाची मेजवानी खास तुमच्यासाठी… काळोखी रात्र, अंगाला झोंबणारी थंडी आणि मोकळ्या मैदानात रंगलेली पोपटीची पार्टी हे दृश्य सध्या रायगडमध्ये अनेक …

Read More »

कोरोनाविरुद्ध आणखी एक पाऊल

देशात कोविड-19 विषाणूनंतर आता नवा उत्प्रेरक ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी नवनव्या नियमावली लागू होत असताना दुसरीकडे सातत्याने उपाययोजनाही केल्या जात आहेत. नागरिक सुरक्षित राहणे ही त्यामागची भावना आहे. ज्येष्ठ, प्रौढ आणि 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होऊन देशाने …

Read More »

आधारवडाच्या सावल्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले की सहजच कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या या ओळी आठवतात- जीवन त्यांना कळले हो… मीपण ज्यांचे पक्व फळापरि… सहजपणाने गळले हो… वैयक्तिक जीवनातील खडतर परिस्थितीवर अत्यंत परिश्रमपूर्वक मात करून शिक्षणाच्या जोरावर रामशेठ यांनी स्वत:चे जीवन यशस्वीरीत्या साकारलेच, पण आपल्या वाट्याला आलेल्या त्या खडतर …

Read More »

सामाजिक जाणीवांचे प्रेरणा भवन : लोकनेते रामशेठ ठाकूर भवन

27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ‘या इमारतीचे उद्घाटन मा.शरदरावजी पवार यांचे हस्ते होत आहे.छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विषयाचे माजी विद्यार्थी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सत्कार्याचा परिचय करून देणारा हा संक्षिप्त लेख… छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज. जून 1947 पासून हे कॉलेज सुरु …

Read More »

’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’

गोरगरीब विद्यार्थ्यांचा आधारवड रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा जपत सातारच्या ज्ञानभूमीत सहा कोटी 27 लाख रुपये खर्चून लोकनेते रामशेठ ठाकूर भवनची उभारणी केली आहे. या भवनाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 27) …

Read More »

सुधागडातील खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे बनलेय जिकिरीचे

सुधागड हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जवळपास 100 महसुली गावे आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा अधिक आदिवासी व ठाकुरवाड्या असून त्या दुर्गम भागात तसेच डोंगरावर वसलेल्या आहेत. यातील काही गावे व वाड्यांपर्यंत कच्चा रस्ता किंवा पायवाटच जाते, तीही स्थानिकांनीच तयार केलेली. तर काही रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड, खडी आणि …

Read More »

कोरोनासंबंधी दिशानिर्देश

वैश्विक महामारी कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन देशात पोहचलेला असून आपले हातपाय पसरत आहे. ही संख्या सुरुवातीला नगण्य होती, पण हळूहळू आकडा वाढतोय. कोरोनाचा पूर्वानुभव पाहता केंद्र सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच केंद्राने राज्यांना नव्याने दिशानिर्देश देऊन अलर्ट केलेले आहे. वर्ष संपायला आले आणि कोरोनारूपी संकट पुन्हा एकदा आपला …

Read More »

हिवाळी नव्हे, वादळी!

अवघ्या आठवड्याभरात हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या इराद्याने महाविकास आघाडी सरकारने मुंबईमध्ये सभागृहाचे कामकाज सुरू केले खरे, परंतु येत्या आठवड्याभरात कशाकशाला तोंड द्यायला लागणार आहे याची चुणूक सत्ताधार्‍यांना पहिल्या दिवशीच मिळाली असेल. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला जबरदस्त धारेवर धरले. फडणवीस यांच्या …

Read More »