प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे ः सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचार्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून या आरोपांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर दिले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे. …
Read More »काँग्रेसची न्याय योजना अडचणीत
अलाहाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने न्याय योजनेची घोषणा केली. या घोषणेंतर्गत गरिबाच्या खात्यात महिन्याला सहा हजार, तर वर्षाला 72 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली, पण या योजनेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असून, त्याबाबत काँग्रेसला नोटीस बजावली आहे. न्याय योजना म्हणजे …
Read More »देशभक्ती हा आजार नाही -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बालाकोट एअर स्ट्राईकनंतर खर्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने उग्र राष्ट्रवादावर भर दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. तुम्ही माझे कुठलेही भाषण ऐका. त्यात जास्त भर विकासाच्या मुद्द्यावर आहे, पण ते मुद्दे माध्यमांकडून ठळकपणे अधोरेखित केले जात नाहीत. अनेक दशकांचा दहशतवाद आणि आपल्या सैनिकांचे …
Read More »चाकूने फोडले मित्राचे डोळे; क्रिकेटवरून वाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सहा महिन्यांपूर्वी क्रिकेटवरून झालेल्या वादातून सहा जणांनी त्यांच्या 22 वर्षांच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीच्या नेब सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली. मित्राची हत्या करताना सहाही आरोपींनी क्रूरपणाचा कळस गाठला. हत्या करण्यापूर्वी तरुणाचे चाकूने डोळे फोडले. …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
ठाणे ः प्रतिनिधी :अवघा देश निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार परिसरात इयत्ता 9वीत शिकणार्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही 15 वर्षीय पीडित मुलगी घटना घडली तेव्हा आपल्या मित्रासोबत होती. दोघे निर्जन स्थळी पोहचल्याचे हेरून दोन लोकांनी तिच्या मित्रासह मुलीला झाडाला बांधले आणि …
Read More »आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या नक्षलीचा खात्मा
छत्तीसगड ः वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली. दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात …
Read More »आम्हाला गुंड नको, खासदार हवेत
उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला रत्नागिरी ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. याआधी इथे गुंड होते. विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली. आम्हाला गुंड नकोत, तर खासदार हवे आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »अपघातात मुंबईचे चौघे गंभीर जखमी
नांदूरवैद्य ः प्रतिनिधी नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्विफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11.45 वाजेदरम्यान घडली. नाशिकहून मुंबईकडे जात असताना स्विफ्ट गाडी क्र. (एमएम 01 बीजी 1561) या गाडी चालकाचा समोर गतिरोधक असल्यामुळे ब्रेक दाबण्याच्या स्थितीत ताबा सुटल्याने समोरच …
Read More »प्रेयसीला ब्लॅकमेल करणारा प्रियकर गजाआड
चेन्नई ः वृत्तसंस्था अल्पवयीन प्रेयसीचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देणार्या दोन युवकांना पोलिसांनी रविवारी अटक केली. पीडित मुलगी खासगी इंजिनिअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. चेन्नईत पल्लीकारानाय येथे राहणार्या जी. श्रीनाथ (20) नावाच्या मुलाबरोबर या मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमात असताना या मुलीने श्रीनाथला भरपूर गिफ्ट …
Read More »‘बाटा’ला ठोठावला नऊ हजार रुपयांचा दंड
चंदीगड ः वृत्तसंस्था सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल बाटा इंडिया लिमिटेडला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंदीगडमधील एका ग्राहकाने पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल ‘बाटा’विरोधात तक्रार केली होती. ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत चंदीगड ग्राहक मंचाने ‘बाटा’ला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper