Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर

नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल कर्जत ः बातमीदार नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणेदोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1,435 पायर्‍या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला …

Read More »

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खोपोलीत भाजप युवा मोर्चातर्फे बाईक रॅली

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा खोपोली शाखेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत बुधवारी (दि. 10) शहराच्या शिळफाटा ते खोपोली गाव अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिळफाटा येथील पूर्णाकृती पुतळ्यास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बाईक रॅलीस …

Read More »

एडका पॉईंटचे सातत्याने बांधकाम अन् पडझडही

पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र. 42 या रस्त्याच्या रूंदीकरणादरम्यान डोंगर कापण्यात आल्याने सुटलेला मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतुकीसाठी आंबेनळी घाट बंद ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या नव्याने मोरीचे बांधकाम करून तेथे तयार झालेल्या एडका पॉईंट धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना सोयीस्कर अशी मोरी बांधली असली तरी अद्याप …

Read More »

अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर

नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल कर्जत : बातमीदार नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणे दोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1435 पायर्‍या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेरळमधील वेदांत हा वडिलांसोबत स्थानिक परिसरातील …

Read More »

मुरूडजवळच्या समुद्रात अडकून पडलेल्या मच्छीमारांची सुटका

मुरूड : प्रतिनिधी मुरूड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या वेरावळ बंदरातील बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. बोटीच्या तांडेलने नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली होती, …

Read More »

रायगडात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 9) आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबागमध्ये आदिवासी बंधू-भगिनींनी मिरवणूक काढली होती. 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो.  जगभरातील आदिवासींच्या जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातदेखील मंगळवारी हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध …

Read More »

रायगड जिल्ह्यातही इलेक्ट्रॉनिक वाहनाला पसंती

962 ई-वाहनांची नोंदणी; अलिबाग तालुक्यात सर्वाधिक मागणी नागोठणे : राज वैशंपायन रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली असून, गेल्या वर्षभरात तब्बल 962 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर  शेकडो ई-वाहने प्रतीक्षा यादीमध्ये असल्याचे शोरूम मालक सांगतात. इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. …

Read More »

जिल्हास्तरीय वृक्षारोपण मोहिमेचा तिघर येथे शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना वृक्षारोपण व संवर्धन मोहीम महत्वाची आहे. या मोहिमेत पर्यावरण राखण्यासाठी आपण या परिसरात सुमारे सहा हजार देशी झाडे लावत आहोत, असे प्रतिपादन कोंकण विभागाचे महसूल उपायुक्त मनोज रानडे यांनी तिघर धनगरवाडा येथे केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभाग विभागीय आयुक्त कार्यालय रोहयो …

Read More »

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात

ट्रकचालक जागीच ठार, सात जण जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 8) सकाळी चार वाहनांचा अपघात झाला. त्यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य वाहनांतील सात प्रवासी जखमी झाले.  ट्रकमधील दोघाजणांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.  द्रुतगती मार्गावरून …

Read More »

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी (दि. 8) दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. किनारपट्टीवरील भागात पावसाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, पुढील काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनार्‍यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा …

Read More »