Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेण कासू येथे लाखोंचे सागवान जप्त

वडखळ वनविभागाकडून तीन आरोपींवर कारवाई; कटर मशिनी जप्त पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कासू येथील चिरकाम करणार्‍या घरावर धाड टाकून वडखळ वन विभागाने हजारो रुपयांचा सागवान चिरीव माल तसेच कटर मशिन जप्त केल्या.  या प्रकरणी तीघाजणांविरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांनी …

Read More »

आंबेनळी घाटाचे रूंदीकरण होण्याची गरज

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर-महाबळेश्वरदरम्यान असलेल्या सुमारे 32 किमी. अंतराच्या आंबेनळी घाट (फिटझगेराल्ड) रस्त्याची गेल्या वर्षी अतिवृष्टी व भुस्खलनामुळे वाताहत झाली होती. त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र, नजिकच्या काळात होणार्‍या पोलादपूर-वाई-शिरूर या राज्यमार्गाच्या रूंदीकरणासोबतच आंबेनळी घाटाचे रूंदीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे. 22 जुलै 2021 रोजी रात्रभर अतिवृष्टी आणि …

Read More »

चौक येथील पालकर विद्यामंदिरात अल्ट्रा वॉटर फिल्टरेशन प्लांट कार्यान्वीत

चौक : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब मुंबई कार्टर रोड आणि अनार्डे फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चौक (ता. खालापूर) येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात अल्ट्रा वॉटर फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याच्या माध्यमिक शाळेतील स्टँडपोस्टचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष अजय बाबला यांच्या हस्ते …

Read More »

शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी

गॅस पाइपलाइन बाधित शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण अलिबाग : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीच्या गॅस पाइपलाइन बाधित पेण तालुक्यातील शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मोबदला मिळावा, या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. रिलायन्स कंपनीकडून दहेज ते नागोठणे दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले होते. 2017 मध्ये करण्यात आलेल्या …

Read More »

पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 23) भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यां संघामध्ये झाला. त्यामध्ये पनवेल संघाने बाजी मारत अंतिम विजेता संघ म्हणून मान मिळविला आहे. या …

Read More »

पनवेल संघाचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश

पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पार्थ पवारची दमदार फलंदाजी अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता उरण तालुक्यातील भेंडखळ …

Read More »

यांत्रिकी नौकांना मासेमारी बंदी

 खोल समुद्रात जाण्यास मज्जाव; आठ दिवसात हंगाम थांबणार अलिबाग: प्रतिनिधी सागरातील माश्यांचे जनत व्हावे या उद्देशाने कोकण किनारपट्टीवर मत्स्य प्रजनन काळात यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जुन ते 31 जुलै या कालावधीत हे बंदी आदेश कायम राहणार आहे. सहाय्यक मत्सव्यवसाय विभागाने हे आदेश जारी केले आहेत. …

Read More »

मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला

मुरूड ः प्रतिनिधी सुटीचा शेवटचा हंगाम असल्याने मागील दोन दिवसांपासून मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाले. उंटस्वारी व घोडागाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते. स्वतःची वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांची बेसुमार गर्दी जंजिरा किल्ला पहावयास …

Read More »

दिल्लीतील तरुण लोणावळ्यातील नागफणीत बेपत्ता

खोपोली ः प्रतिनिधी लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील नागफणी येथे फिरायला गेलेला दिल्ली येथील एक तरुण शुक्रवारी (दि. 20) दुपारपासून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाने त्याच्या भावाच्या मोबाईलवर मेसेज करून माहिती दिली, मात्र मेसेजनंतर या तरुणाचा मोबाईल बंद दर्शवित आहे. इरफान शहा (वय-24, रा.दिल्ली) असे या तरुणाचे नाव असून लोणावळा शहर …

Read More »

पालीमध्ये स्वतंत्र भाजीमार्केटची मागणी

रस्त्याच्या कडेला बसणार्‍या व्यावसायिकांमुळे अपघाताचा धोका पाली ः प्रतिनिधी पालीमध्ये परिसरातील आदिवासी बांधवांसह अनेक स्थानिक भाजीपाला व फळविक्रेते आपला व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करीत आहेत, मात्र हे या व्यावसायिकांना स्वतंत्र भाजीमार्केटची सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे बसून त्यांना आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र भाजीमार्केटची सोय करावी, …

Read More »