दोन ठार तर अन्य किरकोळ जखमी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कशेडी घाटामध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या अपघातात दोन जण ठार तर एक जखमी झाला.तर शनिवारी पहाटे झालेल्या दुसर्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दोन्ही अपघातात चार वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन हानी झाली आहे. …
Read More »रोहा न.प. कर्मचार्यांचे उद्यापासून कामबंद आंदोलन
रोहे : प्रतिनिधी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी सोमवार (दि. 2) पासून बेमुदत संपावर जात आहेत. त्यात रोहा नगर परिषद कर्मचारीही सहभागी होणार आहेत. नगर परिषद कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन …
Read More »अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा
मनसेचे रोहा पोलिसांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोहे पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोहे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात प्रत्येकाला आपापला धर्म व प्रार्थनेचे स्वातंत्र्य असले तरी यामुळे सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक ठिकाणी कोणालाही त्रास होऊ नये अशी सगळ्यांची …
Read More »ओल्या काजूगरांचा हंगाम सरला
आवक कमी, किंमत वाढली, खवय्यांचा हिरमोड पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात ओल्या काजुगरांचा हंगाम साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला आहे. हा पहिला हंगाम सध्या सरत चालला असल्याने बाजारात काजुगरांची आवक कमी झाली आहे. परिणामी किंमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे खवय्यांचा हिरमोड झाला आहे. फेब्रुवारीत पहिल्या हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात 350 ते 250 …
Read More »समाजाला दिशा देणार्या व्यक्तिमत्वास आपण मुकलो
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; खोपोलीत रोहिदास पाटील, निर्मला पाटील यांची प्रथम पुण्यतिथी खोपोली : प्रतिनिधी सार्वजनिक जीवनात वावरताना जनसामान्यांच्या प्रश्नांना कशाप्रकारे न्याय देता येईल, असा ध्यास रोहिदास पाटील यांनी घेतला म्हणून, गेली पस्तीस वर्षे नगरपालिकेत लवजी गावाचे ते प्रतिनिधित्व करत होते, सामाजिक, शैक्षणिक, राजकारण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच …
Read More »घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती
एका बाजूला उकाड्याच्या आगडोंबामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. खारेपाट विभागातील अनेक गावे, वाड्या वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनतेला पाणी विकत घेण्याची नामुश्कि ओढवलीय तसेच घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरू असून …
Read More »रायगडात पारा 40 अंश सेल्सिअसवर
अलिबाग : प्रतिनिधी रायगडकरांना चैत्र महिन्यातच वैशाख वणव्याचे चटके सहन करावे लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसवर पोहचला आहे. उकाड्यामुळे रायगडकर हैराण झाले असून ऊन जरा जास्तच आहे, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. अलिबाग येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 …
Read More »नाकर्त्या राज्य सरकारविरोधात महाडकर आज महामार्ग रोखणार
पुरापासून मुक्तीसाठी आक्रमक पवित्रा महाड : प्रतिनिधी महाड आणि पावसाळ्यातील पूर हे समीकरण ठरलेलेच. दरवर्षी महाडला पुराच्या पाण्याचा फटका बसून नागरिक, व्यापार्यांचे नुकसान होते. गेल्या वर्षी तर महाडमध्ये महापूर येऊन हाहाकार उडाला. यानंतर महाडकरांनी आक्रमक पवित्रा घेत सावित्री नदीमधील गाळ काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर चालू झालेले हे काम आता …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या हक्कासाठी 2 मे रोजी धरणे आंदोलन
पेण : प्रतिनिधी घोटाळा झाल्याने पेण अर्बन बँकेवर 23 सप्टेंबर 2010 रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आणि रायगडसह मुंबईमध्ये 18 शाखा असणारी 75 वर्षे जुनी बँक आर्थिक दिवाळखोरीत गेली. त्याला आता 12 वर्षे उलटून गेली, मात्र राज्य शासन व अधिकार्यांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे ठेवीदारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष समितीच्या …
Read More »अवैध गौणखनिज उत्खननामुळे मांडला गावाला धोका
प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात मुरूड : प्रतिनिधी गेल्या अनेक महिन्यांपासून मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरावर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केले जात असून याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे. गावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते. मांडला ग्रामपंचायत हद्दीतील गटनंबर …
Read More »